Health University Admission| आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू; कसा कराल अर्ज, जाणून घ्या माहिती…!

अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियाबाबत अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Health University Admission| आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू; कसा कराल अर्ज, जाणून घ्या माहिती...!
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची इमारत.
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 1:11 PM

नाशिकः राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Maharashtra University of Health Sciences) फेलोशिप, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-2022 करिता केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया होत आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना 30 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

या अभ्यासक्रमांना प्रवेश

वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, तत्सम विद्याशाखेचे फेलोशिप व प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच सर्टीफिकेट कोर्स इन इपिडेमिक मॅनेजमेंट, सर्टीफिकेट कोर्स इन ऑपरेशन थेअटर टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन रेडिओग्राफी टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन टेक्नीशियन, रेस्पायरेटरी थेरपिस्ट इन इंटेन्सिव्ह केअर, सर्टीफिकेट कोर्स इन क्रिटीकल केअर डायलासिस, सर्टीफिकेट कोर्स फॉर टेक्निशियन इन पल्मनरी फंक्शन टेस्ट, सर्टीफिकेट कोर्स इन ई.सी.जी. टेक्नीशियन असिस्टन्ट, सर्टीफिकेट कोर्स इन पंचकर्म थेरपिस्ट, सर्टीफिकेट कोर्स इन आयुर्वेद नर्सिंग, सर्टीफिकेट कोर्स फॉर क्लिनिकल इन मेडिको लिगल प्रॅक्टीस, सर्टीफिकेट कोर्स इन होमिओपॅथी फार्मसी, सर्टीफिकेट कोर्स इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कसा करावा अर्ज?

अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियाबाबत अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालक, विद्यार्थ्यांनी 0253-2539156 किंवा 0253-2539197 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे गुणवत्तापुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

शुल्कात सवलत

विद्यापीठाच्या संलग्निकरण नूतनीकरण प्राप्त प्रशिक्षण केंद्रांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. कोविड-19 आजाराची स्थिती पाहता सदर अभ्यासक्रमांसाठी निर्धारित शुल्क भरण्यासाठी 50 टक्के शिथिलता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगले व कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पात्रताधारक विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने विद्यापीठाच्या फेलोशिप व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Central Godavari | नाशिकच्या सेंट्रल गोदावरी संस्थेवर माजी खासदारांची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून आपला पॅनल विजयी

VIDEO: नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, बीड, उस्मानाबादेत मतदानावेळी दोन गटात हाणामारी; पोलिसांचा लाठीमार

NMC scam| मनपा स्टेशनरी घोटाळा, आतापर्यंत चार जणांना अटक; फाईल्स कंत्राटदाराकडं पोहचल्या कशा ?

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.