Subhash Desai : रायगडमधील ‘सेझ’साठी घेतलेल्या जमिनींची सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करणार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची विधानभवनात माहिती
राजगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी शेतक-यांना परत करण्याबाबत जिल्हाधिका-यांकडे सुरू असलेली सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली.
मुंबई : राजगड (Raigad) जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी शेतक-यांना परत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. महामुंबई सेझ कंपनीसाठी उरण पेण, पनवेल तालुक्यातील 1 हजार 504 हेक्टर जमिन शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने सदरची जमिन शेतक-यांना परत करण्यात यावी अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याला विलंब होत असल्याकडे लक्ष वेधत आमदार ॲड आशिष शेलार यांनी शासन सदर जमिनी परत करण्यास का विलंब करीत आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, याबाबत जिल्हाधिका-यांकडे सुनावणी सुरू असून लवकरात लवकर ही कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. त्यावर ही सुनावणी कधी पुर्ण होणार असा प्रश्न आमदार ॲड आशिष शेलार (Ashish shelar) यांनी केला त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी तीन महिन्यात सुनावणी पुर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या चर्चेत सहभागी होताना आमदार महेश बादली यांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनींची बैठक घ्यावी अशी मागणीही केली.
आशिष शेलारांनी विचारला होता प्रश्न
महामुंबई सेझ कंपनीसाठी उरण पेण, पनवेल तालुक्यातील 1 हजार 504 हेक्टर जमिन शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने सदरची जमिन शेतक-यांना परत करण्यात यावी अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याला विलंब होत असल्याकडे लक्ष वेधत आमदार ॲड आशिष शेलार यांनी शासन सदर जमिनी परत करण्यास का विलंब करीत आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय की, राजगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी शेतक-यांना परत करण्याबाबत जिल्हाधिका-यांकडे सुरू असलेली सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करण्यात येतील.
शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांच्या जमिनी राजगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी जवळपास 1 हजार 504 हेक्टर संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रल्प न झाल्याने जमीनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी आता तीन महिन्यात पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या होत्या त्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या