Shiv Sena | मोठी बातमी! शिवसेनेची लढाई अजून संपलेलीच नाही? सुप्रीम कोर्टात 2 याचिकांवर सुनावणी

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी दिल्लीतून समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 सप्टेंबरला दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम पडू शकतो.

Shiv Sena | मोठी बातमी! शिवसेनेची लढाई अजून संपलेलीच नाही? सुप्रीम कोर्टात 2 याचिकांवर सुनावणी
supreme courtImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 5:51 PM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : सुप्रीम कोर्टात सोमवारी शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावणी पार पडणार आहेत. शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केलीय. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होणार असताना आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणी काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबतच्या सर्व चर्चा थांबल्या होत्या. पण आता पुन्हा याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

‘या’ दोन याचिकांवर सुनावणी होणार

सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी पार पडली नव्हती. पण आता येत्या सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी दुसरी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. सुनील प्रभू यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह जे. बी. पार्डीवाल आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या याचिकांची 18 आणि 19 असे अनक्रमे नंबर आहेत. त्यामुळे या याचिकांवर एकामागे एक सुनावणी होईल. या सुनावणीत नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आदेश

दरम्यान, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली आहे. या पक्षाच्या दोन्ही गटांमध्येसुद्धा आता कायदेशीर लढाईला सुरुवात झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगात येत्या 6 ऑक्टोबरला महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.