एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या (St Merger) याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण आजही या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख
एसटी विलीनीकरणावर सुनावणी शुक्रवारी
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 4:11 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या (St Merger) याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण आजही या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने (High Court) पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 109 दिवस विलीनीकरणासाठी संप (St Worker Strike) पुकारला होता. सुरूवातील आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या आंदोनवार तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने हे आंदोलन चिघळलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते. या संपामुळे एसटीचे तर नुकसान झालेच आहे. मात्र याची झळ अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बसली आहे. या संपामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन अशा कारवाई करण्यात आल्या आहेत.

आज मुंबई हायकोर्टात काय घडलं?

मुंबई हायकोर्टात एसटी विलिकरणाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी महामंडळाच्या वकिलांना मुख्य न्यायाधिशांनी विचारणा केली. 22 डिसेंबरला न्यायमूर्ती वाराळेंनी एक आदेश दिला होता.  22 डिसेबरला देण्यात आलेल्या आदेशानुसार एक मागणी सोडून बाकी सर्व मागण्या पूर्ण केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. सेवा ज्येष्ठतेनुसार एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढही देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. उच्च स्तरीय समितीचा सीलबंद अहवाल हायकोर्टापुढे सादर करण्यात आला. हा अहवाल पाहिलात का, अशी विचारणा महामंडळाच्या वकिलांना हायकोर्टात करण्यात आली. मुख्य न्यायाधिशांनी महामंडलाच्या वकिलांना ही विचारणा केली. तुम्ही आधी अहवाल पाहा, असं आमचं मत असल्याचं मुख्य न्यायाधिशांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता शुक्रवारी या संदर्भातील पुढील सुनावणी पार पडणार आहे.

अजून किती वाट पाहायची?

या सुनावणीसाठी अनेक ठिकाणाहून एसटी कर्मचारी एकवटले होते. कोर्टाकडून आज त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आजही एसटी कर्मचाऱ्यांना तरीख पे तारीख मिळाल्याने त्यांची मोठी निराशा झाली आहे. तीन महिने उलटून गेले तरी या मुद्द्यावर काहीही तोडगा निघालेला नाही. वारंवार महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करत आहे. मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यात हजारो कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. हजारो कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आलीय. तर हजारो कर्मचाऱ्यांवर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे. आता शुक्रवाही तरी हे प्रकरण तडीस लागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नागपूर मनपा निवडणुकीची धूळवड, काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी फोडला बाँब, भाजपची सत्ता उलथविण्याचा प्लान सांगितला

संभाजी महाराजांबद्दल बोलताना उदयनराजे पुन्हा भावूक, म्हणाले बदनामी आणि षडयंत्राचा…

महाराष्ट्राचे रूपडे बदलणाऱ्या समृद्धी महामार्गाचे मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेले खास किस्से!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.