PHOTO : स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली, उघड्यावर अंत्यविधी, जालन्यातील सुन्न करणारे फोटो

जालन्यात स्मशानभूमीत सध्या दिवसभर प्रेतांना उघड्यावर आणि जुन्या शेडमध्ये अग्निदाह दिला जातो (heart touching photos of Jalna crematorium).

PHOTO : स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली, उघड्यावर अंत्यविधी, जालन्यातील सुन्न करणारे फोटो
स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 7:13 PM

जालना : देशभरात कोरोनाबाधितांच्या आकड्याबरोबर मृतकांचा आकडाही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे स्मशानभूमी कमी पडू लागल्या आहेत. स्मशानभूमीबाहेर अंत्यविधीसाठी मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी अंत्यविधीसाठी जागा आणि लाकडंही कमी पडू लागली आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अशी परिस्थिती आहे. त्याला जालना जिल्हा देखील अपवाद नाही. जालन्यात स्मशानभूमीत सध्या दिवसभर प्रेतांना उघड्यावर आणि जुन्या शेडमध्ये अग्निदाह दिला जातो (heart touching photos of Jalna crematorium).

पाऊस पडल्यास स्मशानभूमीत अडचण होण्याची शक्यता

जालना स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतकांच्या अंत्यविधीसाठी जागा कमी पडत आहे. त्यातच पाऊस पडल्यास मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने या ठिकानी आता नवीन शेडचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दिवसभर प्रेतांना उघड्यावर आणि जुन्या शेडमध्ये अग्निदाह दिला जातोय.

जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतकांसाठी एकच स्मशानभूमी

जालना जिल्ह्यामध्ये एकच मुक्तीधाम स्मशानभूमी कोरोना रुग्णावर अंतिम संस्कार करण्यासाठी ठरवून दिलेली आहे. जिल्ह्यात इतरही स्मशानभूमी आहेत. पण तिथे ज्यांचा सामान्य मृत्यू झाला आहे त्यांच्यावर अंत्यविधी केला जातो. सरकारी आरोग्य विभाग कोरोना रुग्णाचे मृत्यूचे आकडे कमी सांगतात. कारण या स्मशानभूमीत कधीकधी सरकारी आकड्यांपेक्षा जास्त अंत्यविधी होतात (heart touching photos of Jalna crematorium).

heart touching photos of Jalna crematorium

स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली, उघड्यावर अंत्यविधी, जालन्यातील सुन्न करणारे फोटो

जालन्यात दिवसभरात 13 रुग्णांचा मृत्यू, 879 नवे बाधित

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात 879 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. जालन्यात आज दिवसभरात 860 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले

जालन्यात एकीकडे स्मशानभूमी अपुरी पडत असल्याची माहिती समोर येत असताना बीडमधूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे.

संबंधित बातमी : Photo: मोठमोठ्या भाषणांच्या जेव्हा ‘तिरड्या’ निघतात, आश्वासनाचं ‘स्मशान’ होतं आणि व्यवस्थेचा ‘अंत्यविधी’!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.