देशातील काही भागात 40 डीग्रीवर तापमान, उष्णतेच्या लाटेचा इशारा

महाराष्ट्रातही चंद्रपूर, ब्रह्मपूरी, अकोला, गोंदिया या ठिकाणचे तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेले आहे. महाराष्ट्रात जरी काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी येत्या काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे.

देशातील काही भागात 40 डीग्रीवर तापमान, उष्णतेच्या लाटेचा इशारा
Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 12:57 PM

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशातील काही राज्यात उष्णतेची लाट पसरण्याचा धोका वर्तविला आहे. उत्तर भारत, मध्य भारतासह देशातील काही राज्यात येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दिल्लीसह आजूबाजूच्या प्रांतात येत्या काही दिवसात तापमानात तीन डिग्री सेल्सिअस इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूरातील तापमान 40 डिग्रीच्या पार गेले आहे. त्यामुळे जास्त उन्हात फिरू नये, पुरेसे पाणी सोबत असावे आणि नागरिकांनी उन्हाच्या झळांपासून पुरेशा संरक्षणाची तयारी करूनच घराबाहेर पडावे असे हवामान खात्याने म्हटले आहे.

भारतीय हवामान खात्याने देशातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. उत्तर तटीय आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्यात शनिवार ( 15 एप्रिल ) पर्यंत बिहारमध्ये शनिवार ते सोमवार ( 15 ते 17 एप्रिल ) पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सोमवारपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे. महाराष्ट्रातही चंद्रपूर, ब्रह्मपूरी, अकोला, गोंदिया या ठिकाणचे तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेले आहे.   महाराष्ट्रात जरी काही ठिकाणी पाऊस पडला असलातरी येत्या काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. आयएमडीचे कुलदीप श्रीवास्तव यांनी येत्या काही दिवसात दिल्लीसह देशातील काही राज्याचे तापमान वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजधानी दिल्लीत पारा 40 डिग्रीच्या पुढे जाऊ शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.

उष्णतेच्या लाटेपासून सावधान

बिहारमध्ये शनिवार पासून ते सोमवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानूसार मध्य आणि उत्तर भारतात सध्या असलेल्या तापमानात वाढ होऊन ते 40 ते 42 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहण्याची शक्यता आहे.पश्चिम हिमालयी क्षेत्रातील काही भाग आणि उत्तरपूर्व भारत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडीशा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी आणि केरळात कमाल तापमान सामान्यपेक्षा तीन ते पाच डिग्री सेल्सिअस जादा नोंदले जात आहे. हवामान विभागाने पश्चिम बंगाल, ओडीशा आणि आंध्रप्रदेशात 20 ते 26 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट पसरण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान वाढणार आहे.

उष्णतेची लाट केव्हा येते…

जेव्हा मैदानी प्रदेशात तापमान वाढून कमीत कमी 40 डिग्रीपर्यंत पोहचते, तटीय क्षेत्रात ते कमीत कमी 37 डिग्री तापमान पोहचते आणि पर्वतीय भागात कमीत कमी 30 डिग्रीपर्यंत तापमान पोहचते , किंवा सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्रीपर्यंत पोहचते तेव्हा उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. महाराष्ट्रात चंद्रपूरचे तापमानाचा पारा 42 डिग्रीपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात जास्त फिरू नये. बाहेर पडायचे असेल तर डोक्यावर टोपी घालावी किंवा सुती फडका गुंडाळावा, डोळ्यांना गॉगल लावावा तसेच सोबत पुरेसे पाणी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.