Nagpur flood | पुणे शहरातून NDRF टीम नागपूरमध्ये, नागपुरात एका महिलेचा मृत्यू, वर्धा मार्गावर पूल कोसळला

Nagpur rain flood | नागपुरात झालेल्या पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी प्रचंड पाऊस झाला. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 4 तुकड्या पुण्यावरुन नागपूरकडे रवाना झाल्या आहेत.

Nagpur flood | पुणे शहरातून NDRF टीम नागपूरमध्ये, नागपुरात एका महिलेचा मृत्यू, वर्धा मार्गावर पूल कोसळला
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 2:36 PM

नागपूर | 23 सप्टेंबर 2023 : नागपूरकरांसाठी शुक्रवारीची रात्र आणि शनिवारीची सकाळ कसोटीची ठरली. काही तासांत 106.7 मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने केली. या पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. नागपूर शहरात ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती सांभाळण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे आणि अग्निशमन दलाचे जवानांनी सूत्र हात घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकडे जाणार आहेत.

रात्रीपासूनच नागपुरात रेस्क्यू, एकाचा मृत्यू

नागपूर शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. नागपुरात शुक्रवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. अनेकांचे रेस्क्यू करण्यात आले. पावसामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. सध्या पाऊस थांबला असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. ते नागपुरात जाणार आहे.

वर्धा मार्गावर पूल कोसळला, रस्ता वाहून गेला

वर्धा मार्गावर एक पूल कोसळला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथडा निर्माण झाला आहे. नागपूरात पुरामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंबाझरी परिसरातील ७०० मिटर लांबीचा रस्ता वाहून गेला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शहरात आणि ग्रामीण भागात रस्त्यांचे साधारण २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहे.

पुणे येथून एनडीआरएफची टीम नागपूरमध्ये

पुणे शहरातून NDRF च्या चार तुकड्या नागपूरकडे गेल्या आहेत. पुरातून अनेक लोकांना बाहेर काढण्यात NDRF जवानांना यश आले आहे. NDRF कडून 6 जणांना बाहेर काढले गेले आहे. अजूनही अनेक लोक पुरात अडकल्याची भीती आहे. नागपुरात पंचशील चौक ते झाशी राणी चौकाच्या दरम्यान नाग नदीवर असलेला पूल कोसळला आहे.

परिस्थिती नियंत्रणात- पोलीस आयुक्त

सकाळी परिस्थिती गंभीर होती. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पुढील काळात पाऊस झाला तर त्यासाठी तयारी करण्यात येईल. पावसामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच काही ठिकाणी घरे कोसळली आहेत. वर्धा महाविद्यालयाजवळ पूल कोसळला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.