AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Rain | नांदेड जिल्हात रात्रीपासून पावसाचा हाहा:कार, अनेक गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन!

नांदेड जिल्हात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आता नदी आणि ओढेकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आलंय. जिल्ह्यात रात्री पावसाने हाहाकार केला असून ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता तिबार पेरणीचे संकट उभं राहिलंय.

Nanded Rain | नांदेड जिल्हात रात्रीपासून पावसाचा हाहा:कार, अनेक गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन!
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 8:57 AM

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्हात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे अनेक शाळांनी आजच्या दिवस सुट्टी जाहीर केलीय. नांदेड शहरासह अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) झालाय, तर पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलय. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. दरम्यान, नांदेडमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफचे एक पथक (NDRF Tim) तैनात ठेवण्यात आलेले आहे. गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये देखील मोठी वाढ झालीयं.

नांदेड जिल्हात रात्रीपासून जोरदार पाऊस

नांदेड जिल्हात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आता नदी आणि ओढेकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आलंय. जिल्ह्यात रात्री पावसाने हाहाकार केला असून ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता तिबार पेरणीचे संकट उभं राहिलंय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेलीय.

हे सुद्धा वाचा

अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरलं आहे, तर तालुक्यातील शेलगाव , शेणी, कोंढा, देळूब सह अनेक गावांचा संपर्क सकाळपासून तुटलेला आहे. लोहा तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रात्रीपासूनच शहरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडीत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी देखील नाहीयं. सध्याच्या मुसळधार पावसाने नांदेड जिल्हातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान देखील झाले आहे.

चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?.
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.