मुंबई : राज्यामध्ये सध्या सर्वदूर पावसाची (Rain) रिपरिप सुरूयं. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर काही ठिकाणी शेतजमिनींचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. एकंदरीतच काय तर राज्यात पावसाची जोरदार बँटिंग बघायला मिळतंय. राज्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण आणि विदर्भात 12 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाकडून दिला गेलायं. तर मध्य महाराष्ट्र (Maharashtra), मराठवाड्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या किनारपट्टीदरम्यान द्रोणीय स्थिती असून त्यामुळे पावसाची जोरदार बँटिंग सुरूयं. पुण्यातही ऑरेंज अलर्ट (Orange Alert) घोषित करण्यात आलायं.
नागपूरमध्ये देखील रात्रीपासून कधी मध्यम आणि रिमझिम पाऊस सुरूयं. आज सकाळपासून सुद्धा रिमझिम पाऊस सुरू झालायं. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर प्रशासनाने सावधानता बाळगण्याचा इशारा नागरिकांना दिलायं. हवामान विभागाने आज नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट दिल्या. इतकेच नाही तर महत्वाचे काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडून नका, असेही सांगण्यात आले.
पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाउस पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. यामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झालीयं. चारही धरणात एकुण 21.54 इतका पाणीसाठा आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत 73.90 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर धरण क्षेत्रात काल सर्वात जास्त 25 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीयं.
अमरावती जिल्ह्यात संततधार पावसाचा कहर सुरूच आहे. काल एका दिवसांत अमरावती जिल्ह्यातील सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातल्याने तीन मजूर तर वरुड तालुक्यात दोन जण आणि तिवसाच्या शिवनगावात एक वृद्ध गेला पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुरात वाहून गेल्याला सहा जनांचा DDRF कडून शोध सुरू आहे.
पुढील चार तासांत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जातंय. येत्या तीन ते चार तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र, येत्या तीन ते चार तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भात काही ठिकाणी एक ते दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यांत मुसळधारांची शक्यता वर्तवली जातंय. गेल्या 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळला. बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.