Pune : सीएनजीच्या वाढीव दराची झळ थेट प्रवाशांच्या खिशाला, 1 सप्टेंबरपासून रिक्षा प्रवास महागणार
डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त म्हणून अनेक रिधारकांनी सीएनजी बसवून घेतले होते. पण आता सीएनजीच्या मागणीत वाढ होत असल्याचे याचेही दर झपाट्याने वाढत आहेत. तीन महिन्यापूर्वी सीएनजी 62 रुपये किलो असा होता तर आता 87 रुपये किलो आहे. वाढत्या दरामुळे आता प्रवासही महागणार आहे. असे असतानाही सीएनजी हा प्रत्येक ठिकाणी मिळेलच असे नाही. त्यामुळे रिक्षाचालकांची होणारी परवड ही वेगळीच असते.
पुणे : अखेर व्हायचं तेच झालं…गेल्या काही महिन्यापासून (Fuel price hike) पेट्रोल-डिझेल बरोबरच (CNG Rate) सीएनजीच्या दरातही वाढ होत होती. त्यामुळे कधी ना कधी याचा भार प्रवाशांवर पडणारच होता. अखेर तसं होत आहे. कारण 1 सप्टेंबरपासून पुण्यातील (Rickshaw journey) रिक्षा प्रवास हा महागणार आहे. आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य त्रस्त होते पण आता सीएनजीचेही दर वाढू लागले आहेत. असे असताना मुख्य शहरांमध्ये सीएनजीचा तुटवडाही भासत आहे. 1 सप्टेंबरपासून 1 किमी प्रवासासाठी पुणेकरांना 14 नव्हे तर 17 रुपये मोजावे लागणार आहेत. तर तेथून पुढील दीड किमीसाठी 25 रुपये द्यावे लागणार आहेत.
सीएनजी दरातील वाढीचा परिणाम
डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त म्हणून अनेक रिधारकांनी सीएनजी बसवून घेतले होते. पण आता सीएनजीच्या मागणीत वाढ होत असल्याचे याचेही दर झपाट्याने वाढत आहेत. तीन महिन्यापूर्वी सीएनजी 62 रुपये किलो असा होता तर आता 87 रुपये किलो आहे. वाढत्या दरामुळे आता प्रवासही महागणार आहे. असे असतानाही सीएनजी हा प्रत्येक ठिकाणी मिळेलच असे नाही. त्यामुळे रिक्षाचालकांची होणारी परवड ही वेगळीच असते. आतापर्यंत सीएनजीमुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला होता. पण त्याचीही अवस्था आता पेट्रोल-डिझेलप्रमाणेच होणार की काय अशी शंका आहे.
अशी होणार दरात वाढ
पुण्यामध्ये 1 किमीसाठी प्रवासासाठी 17 रुपये मोजावे लागत होते. पण आता 62 रुपयांवरील सीएनजी हे थेट 87 रुपयांवर गेल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 किमी प्रवासासाठी आता 17 रुपये तर दीड किमी प्रवासासाठी 25 रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. याचा फायदा रिक्षा चालकांना असेही नाही कारण मुळात सीएनजीच्या दरातच वाढ होणार असल्याने हा परिणाम पाहवयास मिळत आहे.
रि कँलिब्रेशन सक्तीचे
1 सप्टेंबरपासून हे नवे वाढीव दर आकारले जाणार आहेत. त्यापूर्वी रिक्षाचालकांना आरटीओ कार्यालयातून रिक्षाचे रि कँलिब्रेशन करावे लागणार आहे. म्हणजे आता 1 किमीसाठी 17 असे मिटर रिडींग असणार ते 1 किमीसाठी 25 असे करुन घ्यावे लागणार आहे. आरटीओ कार्यालयात ही प्रक्रिया केली जाते. शिवाय एका रिक्षाच्या रि कँलिब्रेशनसाठी 500 रुपये खर्च आहे.