मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त 80 आर, बायकोचे दागिने गहाण, कर्ज कसं फेडू?, फडणवीसांसमोर बळीराजाचा टाहो

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज हिंगोली जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करत आहेत. त्यावेळी औंढा तालुक्यातील असोला गावातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस आणि मुंडे पोहोचले. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त 80 आर, बायकोचे दागिने गहाण, कर्ज कसं फेडू?, फडणवीसांसमोर बळीराजाचा टाहो
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 4:13 PM

हिंगोली: ‘मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त ८० आर, बायकोचे दागिनेही गहाण ठेवलेत. साहेब… सांगा कर्ज कसं फेडू? असा टाहो फोडत हिंगोलीच्या एका शेतकऱ्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आणि फडणवीसांचे पाय धरले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला उठवत काळजी करु नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही देत धीर देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित आहेत. (Hingoli farmer sheds tears in front of Devandra Fadnavis )

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना फटका बसला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज हिंगोली जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करत आहेत. त्यावेळी औंढा तालुक्यातील असोला गावातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस आणि मुंडे पोहोचले. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

फडणवीसांकडून धीर देण्याचा प्रयत्न

मुलीचं लग्नासाठी घेतललं कर्ज सोयाबीन विकून येणाऱ्या पैशातून फेडू, असा विचार असोलातील एका शेतकऱ्यानं केला होता. पण अतिवृष्टीमुळं तोंडचा घास हिरावला गेला. त्यामुळं हतबल झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीसांपुढे रडू कोसळलं. त्यावेळी फडणवीसांनी त्या शेतकऱ्याला धीर देत, आपल्या नुकसानाचा पंचनामा करुन तातडीनं मदत मिळवण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन या शेतकऱ्याला दिलं.

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- फडणवीस

राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या माईकसमोर येऊन बोलतात. पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेणार? त्यामुळे आता सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असं थेट आव्हान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत, अशी मागणीही फडणवीसांनी सरकारकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर कोकण दौऱ्यावर जाण्याची शक्यता, नुकसानीची पाहणी करणार

मी मुख्यमंत्री असताना 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते, आता तुमची वेळ; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

Hingoli farmer sheds tears in front of Devandra Fadnavis

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.