Hingoli | शिवसेनेच्या अभियानात हिंगोलीचा वाद चव्हाट्यावर, डॉ.जयप्रकाश मुंदडांचे नावच बॅनरवरून गायब, काय आहे प्रकरण?
हिंगोलीः शिवसेनेची शिवसंवाद मोहीम (Shiv Sanwad) राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हिंगोलीतदेखील (Hingoli Shivsena) आज पासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियनाला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक हे ह्या अभियानाचं नेतृत्व करत आहेत. संजय मंडलिक हिंगोलीत आल्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. मात्र वसमत विधानसभेचे शिवसनेचे माजी आमदार तथा माजी सहकार मंत्री […]
हिंगोलीः शिवसेनेची शिवसंवाद मोहीम (Shiv Sanwad) राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हिंगोलीतदेखील (Hingoli Shivsena) आज पासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियनाला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक हे ह्या अभियानाचं नेतृत्व करत आहेत. संजय मंडलिक हिंगोलीत आल्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. मात्र वसमत विधानसभेचे शिवसनेचे माजी आमदार तथा माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) यांचे फोटो त्यावर नसल्याने शिवसेनेची अंतर्गत कुजबुज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे. शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात लावलेल्या बॅनरवरून जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय आहे नेमका वाद?
2014 च्या लोकसभेच्या प्रचारावेळी आता काँग्रेसमध्ये असलेले तेव्हाचे शिवसेना खासदार सुभाष वानखेडे यांच्या आणि माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वसमत येथील एका खाजगी मंगल कार्यालयात तुफान राडा झाला होता. त्याचे कारण नंतर असे समोर आले की, वानखेडे हे मुंदडा यांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून मुंदडा समर्थक यांनी वानखेडे गटावर रोष व्यक्त केला होता. त्यात तेव्हा जिल्हा प्रमुख असलेले व आता कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी उडी घेतली होती. त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेत शिवसेना/भाजप युतीचे उमेदवार खासदार सुभाष वानखेडे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाला वानखेडे गटाने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना कारणीभूत ठरवले होते. मुंदडा यांनी स्व पक्षात राहून दुसऱ्या पक्षाला मतदान करण्यास सांगितल्याचा आरोप वानखेडे गटानी मुंदडा यांच्यावर केला होता. यासंबंधीचे काही व्हिडीओ व मेसेजही त्या वेळी व्हायरल केले होते. तेव्हापासून वानखेडे /मुंदडा यांच्या गटात खडके उडतच राहिले.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत काय घडलं?
पक्षांतर्गत खटक्यांमुळे सुभाष वानखेडे यांनी 2019 च्या लोकसभेत शिवसनेला जय महाराष्ट्र ठोकला. कॉग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यात आताचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी त्यांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत केले. ते खासदार झाले. त्यानंतर वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून खासदार हेमंत पाटील आमदार बांगर आणि माजी मंत्री मुंदडा यांच्यामध्ये खटके उडाले. यामागचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांच्या बाजूने मुंदडा यांनी स्टेस्टमेंट दिले होते. राज्यात महाविकास आघाडी असतांनासुद्धा राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे व शिवसेनेचे माजी आमदार मुंदडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अपमान केल्याचा आरोप खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा शिवसंपर्क अभियान स्वागत बॅनरवर मुंदडा यांचे फोटो नसल्याने शिवसेनेमधली अंर्गत गुजबुज चव्हाट्यावर आली आहे..
इतर बातम्या-