मला मारण्याची सुपारी या आमदाराने दिली, पप्पू चव्हाण यांचे गंभीर आरोप

गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली. माझं राजकीय वर्चस्व वाढत होतं. त्यामुळे माझ्यावर खुनी हल्ला झाला.

मला मारण्याची सुपारी या आमदाराने दिली, पप्पू चव्हाण यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 7:07 PM

हिंगोली : भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर काल हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात गोळीबार झाला. गोळीबार करणाऱ्या आरोपींना हिंगोली पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने काही महिन्यांपूर्वी एका मुलीची छेड काढली होती. त्यावेळी पप्पू चव्हाण यांनी आरोपीला तंबी दिली होती. त्याचाच राग मनात धरून गोळीबार केल्याचं पोलीस सांगत आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पण, पप्पू चव्हाण यांनी मात्र गंभीर आरोप केले आहेत.

काल माझ्यावर खुनी हल्ला झाला. यात कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा हात आहे. राम कदम, श्याम कदम यांनी मिळून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मला मारण्याची सुपारी पाच पोरांना देण्यात आली आहे. मी राजकारणात तयार होत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात वेगळं शिजत होतं, असंही पप्पू चव्हाण म्हणाले.

पप्पू चव्हाण यांनी सांगितली आपबिती

माझ्यावर चार गोळ्या या पाच जणांनी झाडले. या पाचपैकी इंदोरीया यांनी पाठीमागून वार केले. गोळ्या गेटवर लागल्या. मला संपवण्याचा ज्यांचा कट होता, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. घटना माझ्यासोबत घडल्याने माझा जबाब घेणे गरजेचे होते. पण, पैशाच्या दबावापोटी गुन्हा दाखल केला आहे. माझ्यावर अन्याय होत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली. माझं राजकीय वर्चस्व वाढत होतं. त्यामुळे माझ्यावर खुनी हल्ला झाला. पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारला विनंती करतो की, या प्रकरणी सीआयडी चौकशी देण्यात यावी, असं पप्पू चव्हाण यांनी म्हंटलं. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलीस म्हणतात,…

पाचपैकी तीन आरोपी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी अक्षय इंदोरीयावर यापूर्वीचा एक गुन्हा आहे. चार वर्षे तो कैदेत होता. बाहेर आल्यानंतर व्यवसाय करत होता. अक्षयचे एका मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं. मुलीच्या नातेवाईकांनी पप्पू चव्हाण यांना सांगितलं. पप्पूने त्यावेळी अक्षयला मारहाण केली होती. त्यावेळी तक्रार झाली नव्हती.

पप्पू चव्हाण यांनी काही आरोप केले आहेत. त्यावर चौकशी करणार आहोत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यांना ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती पोलिसांनी दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.