Hingoli | बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये का ठेवला? रागाच्या भरात मित्राकडून मित्राचा खून, हिंगोलीत 16 वर्षीय युवकाच्या हत्येनं खळबळ

आपल्या बहिणीचा फोटो काढल्याचा राग मनात ठेवून आरोपीने इतर मित्रांच्या मदतीने शुभमचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी शुभमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून औंढा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hingoli | बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये का ठेवला? रागाच्या भरात मित्राकडून मित्राचा खून, हिंगोलीत 16 वर्षीय युवकाच्या हत्येनं खळबळ
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:26 AM

हिंगोलीः बहिणीचा फोटो मोबाईलमध्ये का ठेवले ? असा सवाल करत मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत (Hingoli Murder) घडली. जिल्ह्यातील औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातील ढेगज येथे हा प्रकार घडला. या वादातून 16 वर्षीय युवकाचा खून (Murder) झाला. घरातील बाथरुममध्ये सदर युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात सदर युवकाचा गळा आवळून केल्याची बाब उघडकीस आली. पोलिस तपासानंतर या घटनेमागील खरे कारण उघडकीस आले. सदर घटनेप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडली घटना?

या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे हा प्रकार घडला. येथे शुभम आडे नावाच्या 16 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. शुभमचा खून करून शुभमचा मृतदेह घरातील बाथरुम परिसरात आढळून आला होता. त्यानंतर शुभमचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात आला होता. उत्तरीय तपासणी मध्ये शुभमचा गळा आवळून खुन झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली.मयताच्या मित्रानेचं गळा आवळून खून केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं.

बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये ठेवल्याचा राग

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. शुभमने आरोपीच्या बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये ठेवला होता. त्यामुळे दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. आरोपीने शुभमला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आपल्या बहिणीचा फोटो काढल्याचा राग मनात ठेवून आरोपीने इतर मित्रांच्या मदतीने शुभमचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी शुभमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून औंढा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या-

Success Story : नांदेडच्या शिवारात फुललीय फणसाची बाग, 7 वर्षाची मेहनत यंदा आली कामी

मुंबईमध्ये पुन्हा भाजप विरूद्ध शिवसेना वाद पेटणार! यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपाची पोस्टरबाजी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.