Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli | गद्दारी केली शिवसैनिकांनी बरोबर बाण हाणला, हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांची जयप्रकाश मुंदडांवर टीका

हिंगोलीः शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसेना सोडत नाही. पक्षाशी गद्दारी करणं म्हणजे आपल्या आईशी गद्दारी करणं आहे, असा इशारा शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी हिंगोलीत (Hingoli) दिला. शिवसेनेचे माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) यांना बांगर यांनी चांगलेच फटकारे लगावले. लोकसभा निवडणुकीत पंजा पंजा म्हणाले… लोकांनी चांगलाच पंजा दाखवला. तर विधानसभा निवडणुकीत […]

Hingoli | गद्दारी केली शिवसैनिकांनी बरोबर बाण हाणला, हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांची जयप्रकाश मुंदडांवर टीका
शिवसेना आमदार संतोष बांगर यांची डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यावर टीकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 10:13 AM

हिंगोलीः शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसेना सोडत नाही. पक्षाशी गद्दारी करणं म्हणजे आपल्या आईशी गद्दारी करणं आहे, असा इशारा शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी हिंगोलीत (Hingoli) दिला. शिवसेनेचे माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) यांना बांगर यांनी चांगलेच फटकारे लगावले. लोकसभा निवडणुकीत पंजा पंजा म्हणाले… लोकांनी चांगलाच पंजा दाखवला. तर विधानसभा निवडणुकीत ते बाण बाण म्हणाले आणि शिवसैनिकांनी बाणच हाणला, अशी खोचक टीका बांगर यांनी केली. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शिवसेनेचे माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा हे शिवसंपर्क अभियानात अनुपस्थित आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या बॅनर्सवरदेखील त्यांचे फोटो नाहीत. त्यामुळे स्थानिक शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच बांगर यांनी मुंदडा यांना काल जाहीर सभेत फटकारे लगावले.

हिंगोली शिवसेनेत खदखद का?

2014 च्या लोकसभेत प्रचारावेळी सध्या काँग्रेसमध्ये असलेले तेव्हाचे शिवसेना खासदार सुभाष वानखेडे यांनी माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचं तिकिट कापण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार संतोष बांगर यांनी उडी घेतली होती. त्यावेळी मोदी लाटेत भाजप- शिवसेना युतीच्या सुभाष वानखेडे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. तेव्हा वानखेडे गटाने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना यासाठी जबाबदार ठरवले होते. मुंदडा यांनी पक्षात राहून काँग्रेसचा प्रचार केल्याचे म्हटले गेले.

2019 मध्येही वाद चव्हाट्यावर

2019 मध्ये पक्षांतर्गत खटक्यांमुळे सुभाष वानखेडे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हाही शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यासमोर ते पराभूत झाले. त्यानंतर हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादातही खासदार हेमंत पाटील, आमदार बांगर आणि माजी मंत्री डॉ. मुंदडा यांच्यात खटके उडाले होते. राज्यात महाविकास आघाडी असतांनासुद्धा राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे व शिवसेनेचे माजी आमदार मुंदडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अपमान केल्याचा आरोप खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा शिवसंपर्क अभियानात बांगर यांनी डॉ. मुंदडा यांच्यावर टीकांची चांगलीच सरबत्ती केली आहे.

इतर बातम्या-

यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी

Aurangabad | नाथषष्ठीच्या उत्सवात खिसेकापू आणि मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट, 25 भामट्यांना पोलिसांच्या बेड्या!

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.