‘आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो’, मराठा आंदोलकांच्या गोंधळानंतर अजित पवारांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यानंतर अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. "मराठा आरक्षण समाजाला दिलेलं आहे. ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी सरकारने समिती पाठवलेली आहे. आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत", असं अजित पवार म्हणाले.

'आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो', मराठा आंदोलकांच्या गोंधळानंतर अजित पवारांचं वक्तव्य
मराठा आंदोलकांच्या गोंधळानंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 8:13 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज हिंगोलीच्या वसमतमध्ये पोहोचली आहे. अजित पवार यांची आज वसमतमध्ये सभा पार पडली. या सभेवेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी, अशी मागणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनी केली. या तरुणांना पोलिसांनी मंडपाच्या बाहेर काढलं. तरीदेखील मराठा आंदोलकांची घोषणाबाजी थांबत नव्हती. मराठा आंदोलकांनी बराच वेळ गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. यानंतर अजित पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपल्या भाषणात भूमिका मांडली.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे. मेडिकल आणि नोकऱ्या मराठा समाजातील लोकांना मिळत आहेत. मराठा आरक्षण समाजाला दिलेलं आहे. ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी सरकारने समिती पाठवलेली आहे. आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत. भेदभाव आणि दुर्लक्ष करून चालत नाही. मराठा तरूणांनी समजूतीनं घ्यायला पाहिजे. मागचा इतिहास तुम्ही पाहा ना. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. त्यासाठी एकमतांनी मराठा आरक्षणाचा ठराव केला”, अशी भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली.

अजित पवार यांचे राजू नवघरे यांना मंत्री करण्याचे संकेत

“2019 ला आमदार राजू नवघरे यांना तिकीट दिलेलं. तिकीट वाटप करताना विचारपूस करून तिकिट द्यावं लागतं. पाच वर्षात येथील विकासकामासाठी 2 हजार कोटींची रक्कम दिली. यापेक्षा जास्त रक्कम राजू नवघरेला द्यायची होती. वेगवेगळ्या गावाचे रस्ते आपण मंजूर केलेले आहेत. दफनभूमी कंपाऊडचा निधी देण्यात आला. राजू प्रेमाखातर अधिकचा निधी त्याला देतो. तुम्ही भरभक्तम पाठींबा द्या. राजू नवघरेला उद्याच्या काळात तिकीट द्यायचं, काय करायचं आहे, राजू नवघरेला आमदार ठेवणार नाही. पुढे त्यांची अजून व्यवस्था करतो”, असं म्हणत अजित पवार यांनी राजू नवघरे यांना मंत्री करण्याचे संकेत दिले. “राजू नवघरेला मोठ्या मतांनी निवडणुन द्या”, असं आवाहन करत अजित पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली.

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार आहोत. सोलारवर चालणारे कृषीपंप बसवून देणार आहोत. राजू नवघरे तू लढ. आम्ही कपडे सांभाळतो, असं करू नका. राजू नवघरेही तिकडं आणि कपडेही तिकडे”, असा टोला अजित पवारांनी लगावला.

‘नराधमांना जगण्याचा अधिकार नाही’

“विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार पण खोट सांगू नका. आम्ही सगळ्या जाती-धर्मांचं सरंक्षण करणारे आहोत. महाराष्ट्रबद्दल त्याला प्रेम असायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी पुढे चाललो आहोत. कुठल्याही बापाचा माणूस असला तरी त्याला सोडणार नाही. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. नराधमांना जगण्याचा अधिकार नाही. बदलापुरलाही आपण पाहिलं. कोणत्याही पातळीवर हयगय केली तर सोडणार नाही. कायदे आता कडक करण्यात आलेले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

“शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे. सगळ्यांना वेदना झालेल्या आहेत. कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत असं होऊ नये. महाराजांच्या पुतळ्याबाबतीत असं होणं दुर्देवी. राजकारण करतात, त्यांचं त्यांना लखलाभ आहे. महाराज आपले दैवत आहेत. कुणालाही त्यात सोडलं जाणार नाही”, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.