Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अश्लिल शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठक दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत.

मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अश्लिल शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 8:52 PM

हिंगोली | 6 जानेवारी 2024 : हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये चांगली जुंपली. या बैठकीमध्ये या दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकांना चक्क अश्विल भाषेमध्ये शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची Tv9 मराठी पुष्टी करत नाही. पण ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपवरुन सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण काय?

हेमंत पाटील – हिंमत असेल तर या जिल्ह्यामध्ये

अब्दुल सत्तार – मी घाबरतो का? (शिवीगाळ)

हेमंत पाटील – सहा-सहा महिने झाले मिटींग घेत नाही. लाज वाटली पाहिजे. शे# खाता

अब्दुल सत्तार – तू शे# खाणारा असला तरी मी शे# खाणारा नाही… (शिवीगाळ)

अब्दुल सत्तार – जिल्हा अधिकारी तुला अहवाल देतो का? तुझ्या परवानगीने करतो का?

हेमंत पाटील – मला मागच्या वर्षीचा हिशोब द्या. मागच्या वर्षीचं काय केलं?

अब्दुल सत्तार – तुम्ही पुढे चला. मला विचारल्याशिवाय कोणाचाही आवाज चालणार नाही.

हेमंत पाटील – आवाज दाबतो का? आवाज असा दाबू शकत नाही.

अब्दुल सत्तार – हो हो मला सगळं माहिती आहे.

हेमंत पाटील – अरे काय माहिती आहे तुला? ये इकडे जिल्ह्यामध्ये ये… तुला दावतो

अब्दुल सत्तार – अरे तुझ्या घरी येतो… अरे तुझ्या…(शिवीगाळ)… काय दम आहे…(शिवीगाळ).. हे शिकवायची गरज नाही. हा दबाव दुसऱ्यावर टाका. माझ्यावर चालणार नाही. चला जिल्हाधिकारी मिटींग चालू करा. आता मला विचारल्याशिवाय कोणाला चालू करायचं नाही. जे सन्माननीय सदस्य बोलतील त्यांनी हात वर करा. मी त्यांना बोलण्याची परवानगी देईन. चला सुरु करा.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.