संतोष बांगर यांची विद्यार्थ्यांसमोर जीभ घसरली, सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ, पाहा VIDEO

आमदार संतोष बांगर यांच्याकडे काही विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी एसटी कंडक्टरची तक्रार केली. एसटी कंडक्टर अतिशय अरेरावी भाषेत बोलत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली. त्यानंतर संतोष बांगर प्रचंड संतापले. त्यांनी एसटी अधिकाऱ्यांना बोलवून संताप व्यक्त केला.

संतोष बांगर यांची विद्यार्थ्यांसमोर जीभ घसरली, सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 9:03 PM

हिंगोली | 19 ऑगस्ट 2023 : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडे विद्यार्थ्यांनी बस कंडक्टरची तक्रार केली. बस कंडक्टर विद्यार्थ्यांशी अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. “मुली आहात म्हणून सोडतो. नाहीतर तुम्हाला ठोकलं असतं”, अशी धमकी कंडक्टर देत असल्याची तक्रार विद्यार्थीनींनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची तक्रार ऐकून घेतल्यानंतर संतोष बांगर यांनी बस आगारातील अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं.

“मुली ज्या पद्धतीने बोलत आहेत, तिथे कोण कंडक्टर आहे, तो म्हणतो की, तुमच्या बापाची बस आहे का, बसमधून खाली उतरवतो. अशा कंडक्टरला मी खरंच सांगतो पायाखाली तुडवेन. तुम्हाला माझ्या स्वभावाची कल्पना आहे. मी जेवढा चांगला आहे, तेवढाच खराब आहे. मला कमी-जास्त वाटलं तर मी त्याला मारेन. मला काहीच सांगू नका”, अशा शब्दांत संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं.

“चांगला माणूस कंडक्टर द्या. लेडीज द्या किंवा वयस्कर व्यक्ती द्या. त्याला समज असली पाहिजे. बारीक मुली, लेकरं आहेत. त्यांची गैरसोय व्हायला नको”, असं आमदार संतोष बांगर यांनी आमदारांना सांगितलं. यावेळी विद्यार्थीनी देखील तक्रार करत होत्या. यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन संतोष बांगर यांना दिलं.

संतोष बांगर याआधी देखील अधिकाऱ्यांना अरेरावी करण्यावरुन चर्चेत आले होते. त्यांनी याआधी सरकारी कर्मचाऱ्यावर कानशिलात लगावल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाणदेखील केली होती. याशिवाय त्यांची एका डॉक्टरला बिलावरुन फोनवर शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.