‘अशोक चव्हाण हिंगोलीचं पाणी पळवतायत’ सर्वपक्षीय नेत्यांचा आरोप, शेकडो ट्रॅक्टरसह कळमनुरीत मोर्चा!
कयाधू नदीवरील बंधाऱ्यामुळे हिंगोलीतील पाणी पळवण्याचा बेत अशोक चव्हाण यांनी आखल्याचा आरोप हिंगोलीतील सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या या प्रस्तावाविरुद्ध आज कळमनुरीत आंदोलन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष असतांना बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) हिंगोलीच पाणी पळवीत असल्याचा आरोप हिंगोलीतील राजकीय मंडळीनी करत पाणी पळविण्याचा प्रस्ताव रद्द करावा या मागणी साठी कळमनुरी येथील तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला ह्या मोर्चात शोकडो ट्रॅक्टरसह सर्व पक्षीय लोक प्रतिनिधी उपस्थित होते मागण्या मान्य नाही झाला तर येत्या 26 जानेवारीला पालकमंत्री ह्यांना जिल्हाधिकारी कार्यलयच्या बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला
26 जानेवारीला मोठ्या आंदोलनाचा इशारा
26 जानेवारी ह्या पेक्ष्या ही मोठ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
ह्यांच्याच कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा उभारून या बंधाऱ्यातील पाणी इसापूर धरणात टाकून सदर पाणी नांदेडला नेण्याचा घाट घातला जात आहे. खरबी बंधाऱ्यातून पाणी इसापूर धरणात वळविल्यास कयाधू नदीचं वाळवंट होईल आणि या नदीवर असलेल्या गावातील सिंचनक्षेत्र नष्ट होत, या भागातील पाणी पातळी खालावेल, त्यामुळे खरबी बंधाऱ्यातून कयाधू नदीचं पाणी इसापूर धरणात टाकण्याला हिंगोलीतील सर्वपक्षीय नेत्यांनी कडाडून विरोध केलाय.
सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट
हिंगोली जिल्ह्याचं पाणी पळवण्याच्या या प्रस्तावाविरुद्ध सर्व पक्षातील नेत्यांची एकजूट झाली आहे. खरबी बंधाऱ्यातून पाणी पळविण्याचा प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची समिती गठीत केलीय. नांदेडला जायकवाडी, माजलगाव, एलदरी,सिद्धेश्वर,इसापूर, विष्णुपुरी यासह इत्यादी प्रकल्पातून भरमसाठ पाणी मिळते. तरीसुद्धा हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदीचे पाणी पळविण्याचा बेत अशोकराव चव्हाण यांनी आखला असल्याचा आरोप हिंगोलीकर करतायेत. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आज कळमनुरी तहसिलवर सर्व पक्षीय नेते शेतकऱ्यांच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला.
इतर बातम्या-