माय, तू एकलीच राहिलीस गं, घे ना लस, शंभरीच्या शारजाबाई नको म्हणून अडल्या…

| Updated on: Dec 30, 2021 | 9:23 AM

राज्यभरात सध्या लसीकरणासाठी मोठी मोहीम उघडण्या आली आहे. कारण नसताना लस न घेता फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर एखादे वेळी वेगळेच प्रसंग समोर येत आहेत. इथे त्यांच्या समुपदेशन कौशल्याचाही कस लागतोय.

माय, तू एकलीच राहिलीस गं, घे ना लस, शंभरीच्या शारजाबाई नको म्हणून अडल्या...
आजीबाईंच्या घरासमोर तासभर अधिकाऱ्यांचा ठिय्या
Follow us on

हिंगोलीः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंगावत असताना प्रत्येक जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर लसीकरणासाठी कामाला लागलं आहे. एकिकडे रस्त्यावर विना मास्क आणि लसीकरणाविना फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे तर दुसरीकडे घरोघरी जाऊन अनेकांनी मनधरणी, जनजागृती केली जात आहे. हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत घरोघरी जाणाऱ्या शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस न घेणाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाही असाच अनुभव आला. शंभरीच्या एक आजीबाई लस नाही घ्यायची म्हणून अडूनच बसल्या.

लस घ्यायचीच नाही, हट्टाला पेटल्या

हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत खरबी येथील शंभरवर्षीय शारजाबाई सखाराम कनेरकर या शंभर वर्षे वय असलेल्या आजीबाईंनी लस घेतलेली नव्हती. कुटुंबियांनी कितीदाही समजावून सांगितलं तरी आजीबाईंनी त्यांना जुमानलं नव्हतं. अखेर हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाचं पथक त्यांच्या घरी आले तेव्हा फक्त आजीबाई लसीशिवाय असल्याचं आढळून आलं. मग हे पथक आजीबाईंची समजूत घालण्यासाठी कुटुंबाच्या दारातच ठाण मांडून बसले. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मात्र मी लस घेणार नाही, असा ठाम निश्चयच आजीबाईंनी केला होता.

माय, तू एकलीच राहिलीस गं….

आरोग्य सहाय्यक दत्तात्रय जायभाये, आरोग्य सेविका जे.एफ, खिलारे आशा कर्मचारी अनिता शिरसाठ यांनी आजीबाईंची समजूत घालयचीच असं ठरवलं. शेवटी अधिकाऱ्यांनी आजीबाईंना भावनिक आवाहन करत, माय, तू एकलीच राहिलीस गं, लस घे की असं म्हणून समजूत घातली. जवळपास एक तास समुपदेशन केल्यानंतर शारजाबाई लस घेण्यास तयार झाल्या आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनीही निःश्वास टाकला.

इतर बातम्या-

Nitesh Rane | नितेश राणेंच्या वकिलांनी कोर्टात केलेली ‘ती’ चूक, जी घरत यांनी सुधारली! नेमकं काय झालं?

घोटाळेबाज पुरस्काराची घोषणा करून भाजपच्या कोपरखळ्या, राजेश टोपे घोटाळेरत्न-भाजप