Uddhav Thackeray : स्वत:चा पोरगा खासदार अन् माझा पोरगा.., शिंदेंच्या बंडामागची इनसाईड स्टोरी मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केली

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून हा सगळा प्रकार घडत असल्याची चर्चा होती. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे आला. यामुळे या बंडामागचे मुख्य कारण काय आहे, हे स्पष्ट झाले. काय म्हणाले मुख्यमंत्री?

Uddhav Thackeray : स्वत:चा पोरगा खासदार अन् माझा पोरगा.., शिंदेंच्या बंडामागची इनसाईड स्टोरी मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केली
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 7:38 PM

मुंबई– एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी या घटनेबाबतचा संताप आज शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केला. ठाकरे आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवा असे आव्हान त्यांनी बंडखोरांना थेट दिले. माझा फोटो वापरु नकाच, पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही वापरु नका, असे त्यांनी यावेळी  सांगितले. मी मुख्यमंत्रीपदी नको, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा होती, असेही उद्धव म्हणाले.  त्याच वेळी या बंडामागे नेमकं काय कारण होतं, त्याला उल्लेखही त्यांच्याकडून बोलता बोलता झालाच. मुळात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून हा सगळा प्रकार घडत असल्याची चर्चा होती. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे आला. यामुळे या बंडामागचे मुख्य कारण काय आहे, हे स्पष्ट झाले. काय म्हणाले मुख्यमंत्री?

तुमचा मुलगा खासदार, मग माझा मुलगा..

विठ्ठल आणि बडवे असा आरोप करण्यात येतो आहे. हीच पद्धत ते आदित्य बद्दल करतील. स्वताचा मुलगा खासदार पण माझा मुलगा काही होता कामा नये, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नेमकी वादाची नेमकी ठिणगी कुठे पडली होती हे सांगितले. मी कुठल्या शिवसैनिकांच्या मुलाची प्रगती रोखली होती का, असा सवाल उद्धव यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील वाढत्या वर्चस्वामुळे एकनाथ शिंदे नाराज होती अशी चर्चा आहे.

नगरविकास खाते आदित्यंकडे जाण्याची कुणकुण

एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलया नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढत होता अशी तक्रार करण्यात येत होता. तसेच नगरविकास खात्यातील अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठी आदित्य ठाकरे यांचा चेहरा समोर करण्यात येत होता. त्यामुळे शिंदे नाराज होते. सुभाष देसाई यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला होता. अशा स्थितीत नगरविकास खाते आदित्य ठाकरेंकडे तर उद्योग खाते एकनाथ शिंदेंकडे जाईल अशी चर्चा होती, त्यामुळेच शिंदे नाराज होते. यावरुन उद्धव आणि त्यांच्या बिनसले असल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

एकदा स्पष्टपणे विचारले होते -उद्धव

एकदा कानावर आल्यावर मी त्यांना बोलवून विचारलं होतं. की हे बंडाचं माझ्या कानावर आहे, त्यावर नाही नाही आपण असे कसे वागू, असे उत्तर शिंदेंनी दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी आजच्या संभाषणात सांगितले आहे. त्यावर खोटं असेल आणि खोटं असावं, हेच आपलं म्हणणं असल्याचं उद्धव यांनी सांगितलं होतं. खोटं असेल तर मुद्दा नाही, पण खोटं नसेल तर स्पष्ट सांगा असे उद्धव म्हमाले होते. त्यावर आपण भाजपासोबत जायला हवं, असा काही आमदारांचा आपल्यावर दबाव आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाल्याचे उद्धव यांनी सांगितले. त्यावर ठीक आहे, आपण जनतेसमोर जाऊ, भाजपासोबत परत जायला, मात्र ज्या भाजपाने आपल्यावर आणि मातोश्रीवर आरोप केल्यानंतर, तुमचं रक्त नाही सळसळत का, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदेंना केला होता, असं उद्धव म्हणाले. यावरुन हा सगळा वाद कुठपर्यंत गेला होता, हे आपल्या लक्षात येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.