अशी होळी कुठेच नसणार…एकमेकांवर दगडांचा मारा, जखमी झाल्यावर डॉक्टरांकडे जात नाही, Video

जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते, त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. या अनोख्या होळीची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होत असते. गावात या महोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळाला.

अशी होळी कुठेच नसणार...एकमेकांवर दगडांचा मारा, जखमी झाल्यावर डॉक्टरांकडे जात नाही, Video
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 2:09 PM

होळीचा सणाला वेगळेच महत्व आहे. परंतु हा सण साजरा करण्याच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. बंजारा समाजामध्ये होळी आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. विविध प्रकारचे गीत गाऊन त्यावर नृत्य केले जाते. दिवाळीसारखा जल्लोष बंजारा समाज होळीला करत असतात. परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वेगळीच होळी साजरी केली जाते. ही होळी रंगा लावून नाही तर एकमेकांवर दगडांचा मारा करुन साजरी करतात. त्यानंतर दगडांच्या माऱ्यात जखमी झालेल्या लोकांना डॉक्टरांकडे नेत नाही. त्यांना मंदिरात नेले जाते. विशेष म्हणजे ही ४०० वर्षांची परंपरा आहे.

अशी खेळतात होळी

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भोयरे हे गाव आहे. या गावात दगडाची अनोखी होळी खेळली जाते. भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवड दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे. गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर दुसरा गट गडाच्या पायथ्याशी असतो. दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत असतात. मागील चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.

दगड लागला तर उपचार करत नाही

दगडांची होळी खेळताना गावाकऱ्यांना दगड लागला तरी उपचार केले जात नाहीत. जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा केला जातो. या दगडफेकीत अद्याप एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड-गोटे जमा करतात. संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात.

हे सुद्धा वाचा

पावसाशी जोडतात संबंध

जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते, त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. या अनोख्या होळीची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होत असते. गावात या महोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळाला.

भीमाशंकरमध्ये अशी आहे परंपरा

श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये होळी या सणाला एक पारंपरिक वारसा लाभला आहे. भिमाशंकर देवस्थान आणि आदिवासी बांधव प्राचीन काळापासून परंपरेप्रमाणे एकत्रित येऊन भिमाशंकरच्या कोकण कड्यावर होळी पेटवली जाते. पुरणपोळीचा नैवद्य देऊन नारळ वाहिला जातो. विशेष म्हणजे या होळीत लाकूड-फाटा न जाळता फक्त पालापाचोळा आणि शेणाच्या गोव-या पेटवून इकोफ्रेंडली होळी साजरी केली जाते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.