अप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा १६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील सेंट्रल पार्क या ठिकाणी पार पडणार असून या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 10:40 PM

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 सोहळा ( Maharashtra Bhushan Award 2022 ) यंदा नवी मुंबईच्या सेंट्रल पार्क या ठिकाणी पार पडणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. रविवारी 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 सोहळा पार पडणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadikari ) यांना हा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. नवी मुंबई मधील खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेश बालदी तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महापालिकेने उपयुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीचा समन्वय राखण्यासाठी नेमावा. तसेच सर्व घटकांनी जबाबदारीच भान ठेऊन दिलेली जबाबदारी पार पाडावी. कार्यक्रमाला लाखो नागरिक येणार असल्याने काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कायदा व सुव्यवस्था तसेच पार्किंगची ही योग्य व्यवस्था करावी करुन ट्रॅफिकबाबत ही योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथक यांची पूर्ण तयारी ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाा 10 लाखांहून अधिक अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी रेल्वेवर मेगाब्लॉक करू नये अशी विविध पक्षांची मागणी आहे. नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात हा कार्यक्रम पार पडणार असल्याने मुख्यमंत्री याबाबत स्वत: लक्ष घालत आहेत.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या तीनही महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ एप्रिलला रात्री १२ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.