शुभांगीचे लग्न जुळले, प्रियकराने भावी नवऱ्याला दोघांचे फोटो दाखवून मोडले जमलेले लग्न

शुभांगीने वडिलांच्या इच्छेमुळे लग्नाला होकार दिला. त्यानंतर सोयरीक जुळले. परंतु तिच्या प्रियकराने वराकडील मंडळींना तिचे असलेले संबंध सांगितले अन् दोघांचे काही फोटो दाखवले. त्यामुळे वराकडील मंडळींनी होणारे लग्न मोडले.

शुभांगीचे लग्न जुळले, प्रियकराने भावी नवऱ्याला दोघांचे फोटो दाखवून मोडले जमलेले लग्न
शुभांगी जोगदंडImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 11:36 AM

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded News) ऑनर किलिंगचा (owner killing) धक्कादायक प्रकार समोर आला. जन्मदात्या बापाने २३ वर्षीय मुलीची हत्या केली. हत्या करुन मुलीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली. आता या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे.

२३ वर्षीय शुभांगी जोगदंड हिची कुटुंबीयांनीच हत्या केली. याप्रकरणात पाच जणांना अटक झाली आहे. त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. इयत्ता आठवीत असतानाच शुभांगीचे लग्न करण्याची तयारी कुटुंबीयांनी केली होती. परंतु शाळेतील शिक्षकांनी तुमची लेक हुशार आहे, तुमचे नाव शिकून मोठे करेल, असे समजावून सांगितले. त्यानंतर तिला शिकण्याची संधी दिली. ती शिकलीही अन् डॉक्टर होणार होती. परंतु शिकताना शुभांगी प्रेमाच्या वाटेवर गेली अन् होत्याचे नव्हते झाले.

परिस्थिती बेताचीच

हे सुद्धा वाचा

शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही. मोठ्या मुलीला गावातील पोलिस पाटलांच्याच घरी दिली. त्यानंतर शुभांगी हिच्या लग्नाचाही विचार केला, परंतु शिक्षकांनी आग्रह धरला अन् तिचे शिक्षण सुरु राहिले. पालकांची ऐपत नसताना तिला नांदेडात शिक्षणासाठी पाठवले.

प्रियकराने मोडले लग्न

शुभांगीने वडिलांच्या इच्छेमुळे लग्नाला होकार दिला. त्यानंतर सोयरीक जुळले. परंतु तिच्या प्रियकराने वराकडील मंडळींना तिचे असलेले संबंध सांगितले अन् दोघांचे काही फोटो दाखवले. त्यामुळे वराकडील मंडळींनी होणारे लग्न मोडले. त्यातूनच बाप अन् भावाने तिला संपवले.

हाडांची डीएनए चाचणी

पोलिसांनी घटनास्थळावरुन काही अवशेष गोळा केले आहेत. हे अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. त्याची डीएनए चाचणी केल्यावर ती हाडे शुभांगीची आहेत का? हे स्पष्ट होणार आहे.

मुलीच्या हत्येनंतर आई-वडील रोज जात होते शेतात, मृतदेह जाळलेल्या ठिकाणी केली नागंरणी...वाचा सविस्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.