Gautami Patil | ….तर माझ्या कार्यक्रमाला येऊ नका, भडकलेल्या गौतमी पाटीलने सरळ सुनावलं

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या नृत्यामध्ये अश्लील हावभाव असतात, असा तिच्यावर नेहमीच आरोप करण्यात येतो. तिच्यावर बरीच टीका झालीय. पण म्हणून तिच्या लोकप्रियतेत तूसभरही फरक पडलेला नाही.

Gautami Patil | ....तर माझ्या कार्यक्रमाला येऊ नका, भडकलेल्या गौतमी पाटीलने सरळ सुनावलं
Gautami Patil
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 8:34 AM

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकारांमध्ये गौतमी पाटीलचा समावेश होतो. राज्यात ठिकठिकाणी गौतमी पाटीलचे कार्यक्रम हाऊसफुल्ल असतात. तिच्या कार्यक्रमाला तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा महाराष्ट्रातील अन्य कुठल्याही भागात गौतमीची प्रचंड क्रेझ आहे. तिच्या कार्यक्रमासाठी लोक लांबून-लांबून येतात. गौतमी पाटीलच नृत्य हे आकर्षणाच केंद्र आहे.

गौतमी पाटीलवरुन समाजात दोन गट पडले आहेत. काही कलाकारांचा गौतमी पाटीलला विरोध आहे. तिच्या नृत्यामध्ये अश्लील हावभाव असतात, असा तिच्यावर नेहमीच आरोप करण्यात येतो.

लोकप्रियतेत तूसभरही फरक नाही

गौतमी पाटीलवर टीका जरी झाली, तरी तिच्या लोकप्रियतेत तूसभरही फरक पडलेला नाही. उलट दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. अलीकडे गौतमी पाटीलच्या काही कार्यक्रमात हुल्लडबाजीचे प्रकारही घडले आहेत. असाच एक प्रकार नगरमध्ये घडला.

….तर माझ्या कार्याक्रमाल येऊ नका

नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी झाली. त्यावरुन गौतमी पाटील चांगलीच संतापली. तिने कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना काही गोष्टी सुनावल्या आहेत. “दगडफेक करायची असेल, तर माझ्या कार्यक्रमाला येऊ नका. कार्यक्रम एन्जॉय करायचा असेल, आनंद घ्यायचा असेल, तर नक्की आवर्जून या” असं गौतमी पाटीलने म्हटलय. नगरच्या कार्यक्रमातील हुल्लडबाजांना गौतमीने हे सुनावलय. गौतमी पाटील परदेशात कार्यक्रम करणार का?

दरम्यान गौतमी पाटीलला परदेशातून कार्यक्रमासाठी विचारणा झाली का? म्हणून पत्रकारांनी विचारलं. त्यावर तिने “हो, विचारणा झालीय. पण मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. मला वाटलं तर मी नक्की करेल आणि संधी आली तर पाहू” असं तिने सांगितलं.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.