पूजा खेडकरने फेक मेडिकल सर्टिफिकेट कसं बनवलं? क्रोनोलॉजी समजून घ्या

पूजा खेडकर यांना 2022 च्या यूपीएससी परीक्षेत मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजेच एकपेक्षा जास्त अवयव दिव्यांग असल्याचं सिद्ध करायचं होतं. यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ऑनलाईन अर्ज केला होता.

पूजा खेडकरने फेक मेडिकल सर्टिफिकेट कसं बनवलं? क्रोनोलॉजी समजून घ्या
पूजा खेडकरImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 9:49 PM

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या प्रचंड अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी फेक मेडिकल सर्टिफिकेट बनवल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यांनी ते नेमकं कसं मिळवलं? याबद्दलदेखील आता खुलासा झाला आहे. पूजा खेडकर यांनी 2019 मध्ये व्हिज्युअली इम्पेयर्ड म्हणजेच दृष्टीदोष असल्याचं सर्टिफिकेट अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून बनवलं होतं. यानंतर त्यांनी 2021 मध्ये मेंटल इलनेस असल्याची तपासणी केली आणि दृष्टीदोष सोबतच मेंटल इलनेस असल्याचं त्यांनी सर्टिफिकेटमध्ये नोंद करुन घेतलं होतं.

पूजा खेडकर यांना 2022 च्या यूपीएससी परीक्षेसाठी मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजेच एकपेक्षा जास्त अवयव दिव्यांग असल्याचं सिद्ध करायचं होतं. यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ऑनलाईन अर्ज केला. इथे रुग्णालयाने त्यांना डाव्या गुडघ्यात लिगामेंट टेअर म्हणजेच (Locomotor Disability about 7%) दाखवलं. यातूनच त्यांची ऑनलाईन आयडी तयार झाली.

पूजा खेडकर यांनी मल्टिपल डिसेबिलिटीज दाखवण्यासाठी औंध येथील रुग्णालयात प्रचंड प्रयत्न केले. पण ऑनलाईन रेकॉर्ड दिसत असल्यामुळे त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही. असं असलं तरीदेखील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलच्या सर्टिफिकेटमुळे पूजा खेडकर यूपीएससीच्या मल्टिपल डिसेबिलिटीसाठी पात्र झाल्या. त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर केंद्र सरकारच्या दिव्यांग मंत्रालयाने पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र दिलं. याच प्रमाणपत्राच्या आधारावर पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्या पास झाल्या.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकर यांनी चुकीचा पत्ता दिला

आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमधून सर्टिफिकेट घेताना आपला चुकीचा पत्ता दिला होता. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या फेक पत्त्याचं रेशन कार्ड दाखवलं होतं. त्यावर प्लॉट नंबर-53, तलवडे, देहू, आळंदी रोड, पिंपरी चिंचवड असा पत्ता लिहिला आहे. पण या पत्त्यावर थर्मोवेरिटा नावाची बंद कंपनी आहे. या कंपनीची प्रॉपर्टी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे. प्रशासनाने ही संपत्तीवर आता जप्ती आणली आहे. याचाच अर्थ पूजा यांच्याकडून फेक एड्रेस दाखवून मल्टिपल डिसेबिलिटीज सर्टिफिकेट मिळवलं होतं. संबंधित पत्ता हा इंडस्ट्रीयल एरिया असताना दिलीप खेडकर यांच्या नावावर बनावट रेशन कार्ड बनवण्यात आलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.