मुंबईवरुन शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकरोडला किती वेळ थांबणार ? असं आहे वेळापत्रक

वंदे भारत ट्रेन ही अशी असणार आहे जी कासारा घाट बँकर शिवाय 37 मीटरला एक मीटर उंच घाट चढणार आहे. तर दुसरी विशेष बाब म्हणजे डबल इंजिनची गरज नसल्याने वेळही वाचणार आहे.

मुंबईवरुन शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकरोडला किती वेळ थांबणार ? असं आहे वेळापत्रक
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 6:10 PM

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत ट्रेनचा ( Vande Bharat Train ) आज महाराष्ट्रात शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्रासाठी दोन वंदे भारत ट्रेनला आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून आज दोन्ही ट्रेन धावल्या आहेत. सीएसएमटीवरुन एक वंदे भारत ट्रेन नाशिक मार्गे शिर्डीला ( Nashik – shirdi ) जाणार आहे. तर दुसरी वंदे भारत ट्रेन मुंबईवरुण पुणे मार्गे सोलापूरला जाणार आहे. यामध्ये अनेक धार्मिक स्थळांना डोळ्यासमोर ठेऊन या ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

मुंबईवरुन शिर्डीला जाणारी वंदे भारत ट्रेन ही नाशिक मार्गे जात असतांना इगतपुरीला मात्र थांबणार नाहीये. थेट नाशिकला येऊनच वंदे भारत ट्रेन येणार असून अवघे दोनचं मिनिटे ही ट्रेन थांबणार आहे.

सीएसएमटी ते शिर्डी हा टप्पा वंदे भारत ट्रेन अवघ्या पाच तास 20 मिनिटांत पार करणार आहे. त्यामध्ये मुंबई ते नाशिक हे अंतर अवघे दोन तास 37 मिनिटांत पूर्ण करणार आहे. त्यामुळे जलद वेगाने धावणारी ही ट्रेन आकर्षणाचा विषय ठरत आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दोन मिनिटे थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेत चढतांना आणि उतरतांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काही प्रवाश्यांनी ही वेळ वाढवून देण्याची मागणी सुरू केली आहे.

वंदे भारत ट्रेन नाशिकसाठीही सुरू व्हावी अशी मागणी नाशिककरांकडून केली जात होती. आज अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या दोनपैकी एका वंदे भारतचा थांबा नाशिकरोडला आहे.

नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आणि पुढे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस महत्वाची ठरणार असून जलद वेगाने प्रवास होणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

मुंबईते शिर्डी जवळपास 343 किलोमीटरचे अंतर आहे. यामध्ये सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी वंदे भारत ट्रेन सुटणार आहे. तर शिर्डीत ही ट्रेन दुपारी साडेकरा वाजता दाखल होणार आहे. तर साडेआठ वाजेच्या दरम्यान ही ट्रेन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर असणार आहे.

सीएसएमटीवरुन निघणारी वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि इगतपुरी न थांबता थेट नाशिकला आणि पुढे मनमाड मार्गे शिर्डीला जाणार आहे. त्यामुळे इगतपुरीच्या प्रवाशांना एकतर नाशिक किंवा ठाण्यावरून बसावे लागणार आहे.

वंदे भारत ट्रेन ही अशी असणार आहे जी कासारा घाट बँकर शिवाय 37 मीटरला एक मीटर उंच घाट चढणार आहे. तर दुसरी विशेष बाब म्हणजे डबल इंजिनची गरज नसल्याने वेळही वाचणार आहे. त्यामुळे कमी काळात मुंबई ते शिर्डी हा प्रवास होणार आहे.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...