उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी किती जागा सोडणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे. तर ठाकरे गटाची प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी युती आहे. त्यामुळे वंचितचा मविआत समावेश झाला नसला, तरी ठाकरे गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागतील.

उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी किती जागा सोडणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 11:58 PM

मुंबई : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटानं महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील 1 जागा अशा एकूण 19 जागांवर दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचीही बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांकडून, लोकसभेच्या जागांची चाचपणी सुरु झालीय. राष्ट्रवादीच्या बैठकीत गेल्या वेळी लढलेल्या 19 जागांचा आढावा घेण्यात आला. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रस्ताव मागवल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.

2019 मध्ये लढलेल्या लोकसभेच्या 19 जागांचा आढावा राष्ट्रवादीनं घेतलाय. सध्याची परिस्थिती आणि कोण इच्छुक आहेत, त्याचीही माहिती घेण्यात आलीय. 2019 मध्ये ज्या 18 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या. त्या 18 जागा आम्ही पुन्हा निवडून आणणार, असं ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे आम्हीच मोठे भाऊ असल्याचं म्हटलंय.

ठाकरे गटाची वंचितसोबत युती

ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे. तर ठाकरे गटाची प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी युती आहे. त्यामुळे वंचितचा मविआत समावेश झाला नसला, तरी ठाकरे गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागतील आणि त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांकडून प्रस्ताव मागवलाय.

हे सुद्धा वाचा

वंचित किती जागा मागणार?

2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि MIMची आघाडी होती. त्यावेळी MIMनं औरंगाबादची एकच जागा लढली होती आणि ती जिंकलीही होती. तर वंचितनं 47 जागा लढल्या होत्या. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर ठाकरेंकडे किती जागा मागणार, हे पाहणं महत्वाचं असेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.