शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे किती मंत्री घेणार शपथ? मोठी माहिती आली समोर

Maharashtra Cabinet : राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता लवकरच शपथविधी होणार आहे. मंगळवारी शपथविधी होणार असून किती मंत्री शपथ घेणार आहेत याची माहिती ही समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेंस अजून कायम आहे. ज्यावर आज रात्रीपर्यंत दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे किती मंत्री घेणार शपथ? मोठी माहिती आली समोर
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 5:04 PM

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाल्याची माहिती समोर येते आहे. मंगळवारी महायुतीचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे 5 मंत्री शपथ घेणार आहेत आणि राष्ट्रवादीचे ही पाच मंत्री शपथ घेणार आहेत. तर भाजपचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. दोन्ही पक्षाने संभाव्य आमदारांची नावे दिल्लीत पाठवली होती. ज्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे.

कोण-कोण होणार मंत्री?

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कळतं आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस अजूनही कायम आहे. पहिल्या टप्प्यात असे एकूण 20 मंत्री शपथ घेणार आहेत.

भाजप सर्वात मोठा पक्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या 132 जागा, शिवसेनेच्या 57 जागा तर राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचे जास्त मंत्री असतील. त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार या्ंच्या राष्ट्रवादीचे मंत्री असतील. मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही शक्यता आहे.

मुख्यमंत्री कोण होणार?

राज्यात महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताच्या जोरावर उद्या नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. आज रात्री महायुतीतील तिन्ही पक्षाचे मोठे नेते दिल्लीत येऊ शकतात. उद्या शपथविधीवर यामध्ये महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत ही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत सर्वात प्रबळ दावेदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जरी महायुतीने निवडणूक लढवली असली तरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व सूत्र होती. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या रणनीतीने भाजप आणि महायुतीचे रेकॉर्ड ब्रेक असे उमेदवार निवडून आणले आहेत. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते. पण पुन्हा एकदा त्यांना जनतेने जनाधार दिल्याने ते या शर्यतीत आघाडीवर आहेत.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...