महाराष्ट्रात मुस्लीम बहुल भागात कोणत्या पक्षाला किती जागा? कोणाला मोठा झटका

Maharashtra Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा झालाच पण योगी आणि पंतप्रधान मोदी याेंच्या प्रचाराचा देखील भाजपला फायदा झाला. अनेक मुस्लीम बहुल भागात भाजपने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे.

महाराष्ट्रात मुस्लीम बहुल भागात कोणत्या पक्षाला किती जागा? कोणाला मोठा झटका
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 8:42 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट पाहायला मिळाली. भाजपच्या नेतृत्वात महायुतीने जोरदार मुंसडी मारली आणि रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला. ज्यामुळे विरोधी पक्षाला 288 पैकी फक्त 50 पेक्षा कमी जागा मिळाल्या. महायुतीने द्विशतक ठोकत 235 जागा जिंकल्या. महाविकासआघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. तेव्हा अल्पसंख्याक समाजाने मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं होतं. त्याचा फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांना झाला. पण विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लीमबहुल भागात देखील सर्वाधिक जागा काबीज केल्या आहेत. महाराष्ट्रात मुस्लीम मतदार 10 टक्के आहे.

निवडणूक निकालांमध्ये जिथे लोकसभेला भाजपला महायुतीला मोठा फटका बसला होता, तिथे विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लीमबहुल भागात ही चांगली कामगिरी केली आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागांची संख्या वाढली आहे. तर काँग्रेसची संख्या घटली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात अशा 38 जागा आहेत जिथे मुस्लीम मतदारांची लोकसंख्या 20% पेक्षा जास्त आहे. पण भाजपने यावेळी तेथील 14 जागा जिंकल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी 11 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला जिथे आधी 11 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मात्र त्यांना फक्त पाच जागा मिळाल्या. महायुतीतील पक्ष शिवसेनेला सहा तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. महाविकासआघाडीतील शिवसेनेला (UBT) सहा जागा आणि NCP (SP) ला दोन जागा मिळाल्यात. उर्वरित तीन जागांमध्ये सपाला दोन आणि एआयएमआयएमला एक जागा मिळाली आहे.

कोणाला किती जागा मिळाल्या?

भाजप 14

काँग्रेस 5

शिवसेना (शिंदे गट) 6

शिवसेना (ठाकरे गट) 5

राष्ट्रवादी (अजित पवार गट) 2

समाजवादी पक्ष 2

राष्ट्रवादी (शरद पवार गट) 1

AIMIM 1

20 टक्के पेक्षा जास्त मुस्लीम मतदार असलेल्या जागा

  • भाजप : भिवंडी पश्चिम, औरंगाबाद पश्चिम, अंधेरी पश्चिम, अकोट, वांद्रे पश्चिम, सोलापूर मध्य, नागपूर मध्य, धुळे, सायन वाडा, कारंजा, पुणे कॅन्टोन्मेंट, रावेर, वाशीम आणि मलकापूर.
  • काँग्रेस : मालाड पश्चिम, लातूर शहर, मुंबादेवी, अकोला पश्चिम, धारावी
  • शिवसेना शिंदे गट : औरंगाबाद मध्य, कुर्ला, चांदिवली, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, बीड
  • शिवसेना ठाकरे गट : भायखळा, वर्सोवा, वांद्रे पूर्व, परभणी, कलिना, बाळापूर
  • राष्ट्रवादी अजित पवार गट : अमरावती, अणुशक्ती नगर
  • समाजवादी पक्ष : मानखुर्द-शिवाजी नगर, भिवंडी पूर्व
  • राष्ट्रवादीचे शरद पवार गट : मुंब्रा-कळवा, जालना
  • AIMIM : मालेगाव मध्य

ओवेसींच्या पक्षाला केवळ 1 जागा

महाराष्ट्र निवडणुकीत AIMIM ला मोठा धक्का बसला आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमला फक्त 162 मतांनी विजय मिळवता आला. इम्तियाज जलील यांचा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पराभव झाला. 2019 मध्ये AIMIM ला दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी एक आमदार खूपच कमी मतांनी निवडून आला. तर दोन जागा वाचवण्यात समाजवादी पक्षाला यश आले.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....