महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार? काय म्हणतोय ओपिनियन पोल

देशात ओपिनियन पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात मात्र वेगळं चित्र दिसू शकतंं. कारणम एनडीएने महाराष्ट्रात ४५ जागांचं लक्ष्य ठेवले आहे. पण ओपिनियन पोलमध्ये अपेक्षित जागा महायुतीला मिळताना दिसत नाहीयेत.

महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार? काय म्हणतोय ओपिनियन पोल
महायुती
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 8:52 PM

Loksabha election : लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप कामाला लागली आहे. राहुल गांधींनी पुन्हा न्याय यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर TV9नं ओपिनियन पोल घेतला आहे. या पोलनुसार महाराष्ट्र आणि देशाचं चित्र नेमकं कसं असू शकते, याचा अंदाज घेतलाय. महाराष्ट्र मे पैतालीस पार म्हणत स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिशन 45 प्लसची घोषणा केलीये. लोकसभेच्या निवडणुकाही घोषित झाल्या आहेत. मात्र TV9-पोलस्ट्राटच्या ओपिनियन पोलनुसार, 45चा आकडा महायुती गाठताना दिसत नाहीये.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. ज्यात, महायुतीला 28 जागा तर महाविकास आघाडीला 20 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. महायुतीच्या 28 जागांमध्ये भाजपला 17 जागा. म्हणजेच 2019च्या तुलनेत भाजपला महाराष्ट्रात 6 जागांचं नुकसान होताना दिसतंय. तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला 11 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

देशात पंतप्रधान मोदींनी 400 पारची घोषणा केलीये. संपूर्ण देशाचा ओपिनियन पोल पाहिल्यास NDAचा आकडा 400 पार होत नसला तरी NDAचा आकडा 400च्या जवळ जाताना दिसतोय.

भाजप प्रणित एनडीए आघाडीला 383 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याची शक्यता आहे. असे ओपिनियन पोलचे आकडे आहेत.

देशभरात एकट्या भाजपचा विचार केल्यास भाजपला तिसऱ्यांदाचा एक हाती सत्ता मिळताना दिसतेय. भाजपला 333 जागा मिळतील असा अंदाज पोलमधून वर्तवण्यात आलाय. 2019च्या तुलनेत 30 जागा भाजपच्या वाढताना दिसतायत.

काँग्रेसला 49 जागा दाखवण्यात आल्यात आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत 3 जागांचं काँग्रेसचं नुकसान होताना दिसतंय. पोलच्या आकडेवारीनुसार इंडिया आघाडीला धक्का देणारं चित्र आहे. देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशातही पुन्हा एकदा मोदींची जादू कायम असल्याचं दिसतंय. भाजपला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं आघाडी केलीय. मात्र TV9 पोलस्ट्राटच्या ओपिनियन पोलनुसार, उत्तर प्रदेशात एनडीएला 80 पैकी 73 जागा. तर इंडिया आघाडीला अवघ्या 7 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

NDA मधल्या 73 पैकी एकट्या भाजपला 70 जागा दाखवण्यात आल्यात. म्हणजेच 2019च्या तुलनेत भाजपला 8 जागांचा आणखी फायदा होताना दिसतोय. तर काँग्रेसला 1 जागा तर समाजवादी पार्टीला 6 जागांची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपकडून प्रचारही सुरु झालाय. आता निवडणुका घोषित झाल्यानंतर इंडिया आघाडीकडूनही प्रचाराला जोर येईल. ओपिनियन पोलचे आकडे हा सॅम्पल सर्व्हेद्वारे अंदाज असतो. आता पुन्हा मोदी सरकारच आणायचं की परिवर्तन करायचं याचा फैसला तर मतदारच करतील.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.