12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना आजपासून मिळणार कोरोना लस, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया
भारतात 3 जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोरोना लस मिळणार आहे.
मुंबई – भारतात 3 जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोरोना लस मिळणार आहे. महाराष्ट्र (maharashtra) राज्यात 65 लाख बालके लसीकरणासाठी पात्र आहेत. 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोर्बेव्हॅक्स (Corbevax) लसचे दोन डोस देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असेल. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु मोहिम राबिवण्यात येणार आहे. ही लस सर्व मुलांना मोफत दिली जाणार असून त्यासाठी CoWIN अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात गाईडलाईन्स नुकतीच जारी करण्यात आली आहे. भारतात 12 ते 14 वर्षातील 7.74 कोटी मुलं आहेत.
लसीकरण नोंदणी प्रक्रिया
- सुरूवातील तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये किंवा कंम्पूटरवरती www.cowin.gov.in वेबसाईट ओपण करा
- वेबासाईटवरती तुम्हाला नोंदणी किंवा साईन असे दोन पर्याय दिसतील, त्यापैकी एक पर्याय निवडा
- दिलेल्या पर्यायात तुमचा मोबाईल नंबर टाईप करा, तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल.
- समजा तुमचा मोबाईल क्रमांक पहिल्या कोरोना लससाठी वापरण्यात आला असेल, तर तिथं असलेल्या अॅड नंबरवरती क्लिक करा. मग तुम्हाला पुढची माहिती नव्याने तिथं उपलब्ध होईल.
- त्यामध्ये तुम्हाला आयडी पुरावा, नाव, लिंग, आणि जन्मवर्ष अशा अनेक गोष्टी भराव्या लागतील. सगळा अर्ज भरून झाल्यानंतर नोंदणीचं बटणावर क्लिक करावे.
- त्यांच्यानंतर तुम्हाला तारिख, स्लॉट, लस घेण्याचं ठिकाण निवडून खात्री करावी लागेल.
बच्चे सुरक्षित तो देश सुरक्षित!
मुझे बताते हुए खुशी है की 16 मार्च से 12 से 13 व 13 से 14 आयुवर्ग के बच्चों का कोविड टीकाकरण शुरू हो रहा है।
साथ ही 60+ आयु के सभी लोग अब प्रिकॉशन डोज लगवा पाएँगे।
मेरा बच्चों के परिजनों व 60+ आयुवर्ग के लोगों से आग्रह है की वैक्सीन जरूर लगवाएँ।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) March 14, 2022
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ट्विट करून दिली माहिती.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून याबाबत माहिती जाहीर केली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेला पुढे नेत आहोत. 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोरोना लस उद्यापासून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 60 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस सुध्दा देण्यात येणार आहे. गुजरातमध्ये 12 ते 14 वर्षे वयोगटातील 22 लाखांहून अधिक मुलांना कोरोना लसीकरणासंदर्भात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मुलांना कोवॅक्सीनचा डोस दिला जात आहे, दुसरा डोस 28 दिवसांनी दिला जाणार आहे.