तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

तुम्हाला सर्व माहिती इंग्रजीत भरावयाची आहे. त्यामुळे स्पेलिंग चुकता कामा नये. स्पेलिंग चुकल्यास अर्थात तुमचं नाव शोधताना अडचण येईल.

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 7:33 AM

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील.

मतदार म्हणून आपलीही जबाबदारी आहे की, आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही (Voter List Name check) , हे तपासून घेणं. याचं कारण मतदान करणं आपला हक्क आहे. त्यामुळे मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

सर्वप्रथम http://103.23.150.139/marathi/ या साईटवर क्लिक करा.

तुम्हाला Name Wise आणि ID Card Wise असे दोन पर्याय दिसतील.

पहिला पर्याय :

तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन District पर्यायावर क्लिक केल्यास – त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन Assembly पर्यायावर क्लिक केल्यास – त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, मतदारसंघाचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

दुसरा पर्याय :

तुम्ही ID Card Wise या पर्यायावर क्लिक करुनही तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते तपासू शकता. त्यासाठी ID Card Wise केल्यानंतर जिल्हा निवडावा लागेल, त्यानंतर मतदान ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल आणि दिलेल्या संख्येची बेरीज टाकावी लागेल, त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

मतदार यादीत तुमच्या नावाचे अनेक पर्याय दिसल्यास काय कराल?

सर्व माहिती भरल्यानंतर अनेकदा एकाच नावाचे अनेक पर्याय दिसतात. अशावेळी तुमचा गोंधळ होऊ शकतो. मात्र, गोंधळण्याचं कारण नाही. तुम्हाला जर अनेक नावं दिसली, तर त्या नावांच्या पुढे VIEW PDF नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक पीडीएफ फाईल उघडेल, त्यात सर्वात खाली तुम्हाला तुमचा पत्ता दिसेल. त्यावरुन तुम्हाला लगेच लक्षात येईल, अनके पर्यायांमधील नेमकं तुमचं नाव कोणतं.

एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व माहिती इंग्रजीत भरावयाची आहे. त्यामुळे स्पेलिंग चुकता कामा नये. स्पेलिंग चुकल्यास अर्थात तुमचं नाव शोधताना अडचण येईल.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.