पतीकडून बलात्कार हा लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार! दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद नेमका कशासाठी?

दिल्ली उच्च न्यायालयात सध्या आरआयटी फाउंडेशन, ऑल इंडिया डेमोक्रेटिक वुमन्स असोसिएशन, एक परुष आणि महिलेच्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरु आहे. भारतीय कायद्यानुसार, पतीला देण्यात येणारी सूट अथवा सवलत संपुष्टात आणण्याची विनंती यात करण्यात आली आहे.

पतीकडून बलात्कार हा लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार! दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद नेमका कशासाठी?
ईडीलाही आरटीआय कायद्याच्या तरतुदी लागूImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 1:24 PM

नवी दिल्लीः भारतीय कायद्यानुसार (Indian Law) लग्नानंतर पतीला पत्नीशी संबंध ठेवणे आणि तेदेखील तिची इच्छा नसतानाही संबंध ठेवण्याची सूट दिली आहे. मात्र पत्नीच्या आज्ञेशिवाय झालेले हे संबंध म्हणजे बलात्कार किंबहुना लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार असल्याचा युक्तीवाद दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) करण्यात आला. तसेच कायद्यानुसार, पतीला देण्यात आलेली ही सवलत आता संपुष्टात आणावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

काय आहे नेमका खटला?

भारतीय बलात्कार कायद्याअंतर्गत पतीला अपवादात्मक स्थितीत पत्नीशी संबंध ठेवण्याचा दिलेला हक्क रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात एक स्त्री, एक पुरुष आणि RIT फाउंडेशन, ऑल इंडिया डेमोक्रेटिक वुमन्स असोसिएशन तर्फे दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्या NGO ने आयपीसीच्या कलम 375 च्या घटनात्मकतेला आव्हान दिले आहे. कारण विवाहित महिलांवर पतीकडून होणारा लैंगिक अत्याचाराला या कायद्याअंतर्गत भिन्न स्वरुप देण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होईल, मात्र दिल्लीच्या उच्च न्यायालयात वकिलांनी केलेले युक्तीवाद अत्यंत महत्त्वाचे असून यातून घटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

वकिलांचा काय युक्तिवाद?

या प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेचे प्रतिनिधीत्व ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्विस करत आहेत. न्यामूर्ती राजीव शकधर आणि सी हरी शंकर यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना ते म्हणाले, ‘वैवाहिक बलात्कार हा लैंगिक हिंसाचाराचा सर्वात मोठा प्रकार आहे, जो आपल्याकडील विविध घरांमध्ये घडत असतो. विवाह संस्थेअंतर्गत किती वेळा बलात्कार घडतो, त्याची कधीही नोंद होत नाही. ही आकडेवारी कधी पुढेही आली नाही आणि तिचे विश्लेषणही झालेले नाही. अशा वेळी कुटुंबीय किंवा पोलीसदेखील पीडितेच्या मदतीला धावून येत नाहीत. जगभरातील न्यायालयांनी वैवाहिक बलात्कार गुन्हा मानला आहे आणि लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पत्नीची irrevocable अर्थात बदलता न येणारी, अपरिवर्तनीय संमती ही संकल्पना संपुष्टात आणली पाहिजे.

सरकारी वकील नंदिता राव काय म्हणाल्या?

सरकारी वकील नंदिता राव म्हणाल्या, प्रत्येक कायद्यात विवाहित स्त्री आणि अविवाहित स्त्री वेगळ्या दृष्टीने पाहिली गेली आहे. वैवाहिक बलात्कार हा भारतातील क्रूरतेचा गुन्हा आहे. प्रत्येक कायद्यानुसार विवाहित महिला आणि अविवाहित महिला भिन्न आहेत. राव यांनी हाही दावा केला आहे की, वारंवार वैवाहिक बलात्काराचा बळी ठरल्याचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्यापैकी एकाच्या बाबतीत तर आवश्यक कारवाईसाठी कलम 498 अ आयपीसीनुनसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कलम 498 अ काय आहे?

IPC कलम 498 अ हे विवाहित महिलेवर पती किंवा सासरच्या मंडळींनी अत्याचार करण्यासंबंधी आहे. या व्यक्तींनी स्त्रीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे किंवा तिला गंभीर दुखापत अथवा जीवाला धोका निर्माण करणारे वर्तन केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला जातो.

जगभरातील निकालांचे दिले दाखले

ज्येष्ठ वकील गोन्सावलिस युक्तिवाद करताना म्हणाले, मूल्य प्रणाली आणि महिलांचे हक्क हे काळानुरूप बदलत गेले. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, युरोप संघ आणि नेपाळमधील न्यायलयांनी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांनी अशा सर्व गुन्ह्यांमध्ये पत्नीची गृहित संमती ही असमर्थनीय होती, हा युक्तीवाद करत विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांनुसार यात परिवर्तन होत गेले. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले की, हिंदू धर्माने पत्नीवरील बलात्काराच्या घृणास्पद कृत्याला सूट दिलेली नाही. तसेच वैवाहिक बलात्कार ही पाश्चिमात्य संकल्पना म्हणण्यावरही गोन्साल्विस यांनी आक्षेप घेतला. काही भारतीय जोडप्यांमधील लैंगिक हिंसाचाराचे प्रमाण नोंदवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचा अहवालावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

केंद्राच्या प्रतिज्ञापत्राकात काय म्हटलंय?

केंद्र सरकारने याप्रकरणी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, वैवाहिक बलात्कार हा फौजदारी गुन्हा ठरू शकत नाही. कारण असे केल्यास विवाहसंस्था अस्थिर करण्याचे तसेच पतींवर दबाव टाकण्याचे ते साधन बनू शकते.

या प्रकरणी पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होईल.

इतर बातम्या-

केरळच्या शाळेत सर आणि मॅडम बंद, विद्यार्थी यापुढं शिक्षकांना टीचर नावानं हाक मारणार, नेमकं कारण काय?

ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.