क्षणात संपवलं सात जन्माचं नातं, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचं टोकाचं पाऊल

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

क्षणात संपवलं सात जन्माचं नातं, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचं टोकाचं पाऊल
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 3:59 PM

बीड : नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (husband suicide after wife attempts suicide in beed)

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये परळीच्या पांगरी कॅम्प इथली ही घटना आहे. इथे पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. प्रियंका पंडित आणि सायस पंडित अशी आत्महत्या करणाऱ्या जोडप्यांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने विष घेऊन तर पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.

परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघांची उत्तरीय तपासणी सुरू आहे. यादरम्यान दोन्हीकडील नातेवाईकांनी परळी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. परळी तालुक्यातील प्रियंका आणि सायस यांचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. घरगुती कारणावरून या दोघांत वाद झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातूनच पत्नी प्रियंका हिने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी परळीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, तिचा मृत्यू झाला. रात्री अकराच्या सुमारास तिचे पती सायस पंडित यांनी रात्री पांगरी कॅम्प इथं राहत्या घरात गळफास घेतला.

स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. (husband suicide after wife attempts suicide in beed)

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी परळी पोलीस स्थानिकांची आणि मृतांच्या नातेवाईकांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये  वाद नेमका का झाला? किंवा काही इतर मतभेद होते का? अशा अनेक प्रश्नांचा पोलीस शोध घेत आहेत. तर एकीकडे जोडप्याच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या –

आमटे परिवारातील वाद ते विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, कोण होत्या शीतल आमटे?

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप

(husband suicide after wife attempts suicide in beed)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.