माझा राग श्रीकांत शिंदेवर नव्हे तर पुरातत्त्व विभागावर; संभाजीराजेंची स्पष्टोक्ती

एरवी पुरातत्व खाते रायगडावरील एखादा दगड हलवायचा म्हटलं तरी परवानगी देताना नाकीनऊ आणते. | MP sambhaji raje

माझा राग श्रीकांत शिंदेवर नव्हे तर पुरातत्त्व विभागावर; संभाजीराजेंची स्पष्टोक्ती
मी तेव्हा पुरातत्व खात्याला फटकारले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांना धारेवर धरण्याचा प्रश्नच येत नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 8:04 AM

पंढरपूर: शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरुन खासदार छत्रपती संभाजीराजे (MP sambhaji raje) यांनी टीका केल्यानंतर वादंग निर्माण झाला होता. ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून करण्यात आली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदे नाराज झाले होते. (I am angry on archaeology department not with Shrikant Shinde says MP sambhaji raje)

या पार्श्वभूमीवर शनिवारी पंढरपूर येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत छत्रपती संभाजीराजे यांनी आपली बाजू स्पष्ट केली. रायगड किल्ल्यावरील विद्युत रोषणाईसंदर्भात मी टीका केल्यानंतर अनेक शिवभक्तांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मी तेव्हा पुरातत्व खात्याला फटकारले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांना धारेवर धरण्याचा प्रश्नच येत नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

एरवी पुरातत्व खाते रायगडावरील एखादा दगड हलवायचा म्हटलं तरी परवानगी देताना नाकीनऊ आणते. मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष असल्याने अनेक कामांच्यावेळी असा अनुभव आला आहे. एरवी लहानसहान गोष्टींबाबत दक्ष असणाऱ्या पुरातत्व खात्याला महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात सौम्य रोषणाई असावी, एवढीशी गोष्टही समजली नाही का? मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष असल्याने मी यावर आक्षेप का घेऊ नये, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते संभाजीराजे?

भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल’, अशा शब्दात संभाजीराजेंनी पुरातत्व खात्यावर शरसंधान साधले होते.

दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह: श्रीकांत शिंदे

दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असं म्हणत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांनी भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना टोला लगावला होता.

राजसदर काळोखात होती, महाराज काळोखात होते. मी विद्युत रोषणाई एका प्रमाणिक हेतूने करायला सांगितली होती. रोषणाईही वेगळ्या प्रकारची असू शकते, राजकीय-राष्ट्रीय रोषणाईपण असू शकते, हे मला आज कळलं. दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

(I am angry on archaeology department not with Shrikant Shinde says MP sambhaji raje)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.