विशाळ गडासाठी मी आक्रमकपणा घेतला तर त्याचा मला गर्व आहे – संभाजी राजे
विशाळ गडावरील अतिक्रमनाच्या विरोधात संभाजी राजे यांनी काल आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर तेथे हिंसा झाली. संभाजी राजे आज पोलीस स्टेशनला हजर झाले होते. पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय की नाही हे त्यांना सांगितलं नसल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

विशाळ गडावर झालेल्या घटनेनंतर संभाजी राजे आज पोलीस स्टेशनला हजर झाले होते. त्यांच्यावर इतर ५०० हून अधिक शिवभक्तांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत होती. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला पोहोचले होते. संभाजी राजे म्हणाले की, गुन्हा दाखल झाल्याचं कळताच मी पोलीस स्टेशनला हजर झालो होते. मी प्रश्न केला की, ज्या शिवभक्तांवर गुन्हा दाखल केलाय. त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा मला जबाबदार ठरवा. माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे का. त्यांनी शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. नेमकं हे काय याची कल्पना नाही. माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी हजर आहे. आम्ही याच्यावर काही बोलू शकत नाही असं ते म्हणाले.
‘अतिक्रमण झाल्याने काल मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर अतिक्रमण काढण्याचं काम सुरु आहे. याला जातीय रंग दिला जात आहे. हिंदू मुस्लमान असं नाहीय. पहिल्या ज्या व्यक्तीचं अतिक्रमण काढलंय तो हिंदू व्यक्ती आहेत. पाटील असं त्यांचं नाव आहे.’
‘छत्रपती शाहू महाराजांनी दोन भूमिका घेतल्या आहेत. एक भूमिका खासदार म्हणून घेतलीये तर दुसरी थेट घेतलीये. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं उपमुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग लावाली. हा विषय इथे सुटू शकत नाही असं मी त्यांना सांगितलं. कारण हा प्रश्न वरिष्ठाच्या पातळीवर सुटू शकतो. पण चर्चा झाली नाही. मुंबईत अशी कोणतीही मिटिंग झाली नाही.’
‘छत्रपती संभाजी राजे आक्रमक असताना जे घडलं त्याचं मी समर्थन करत नाही. ते माझे वडील आहेत.ते महाराज आहेत. त्यामुळे त्यांनी महाराज म्हणून भूमिका मांडली. ती मी स्वीकारतो. मला त्यांना विनंती करायची आहे की, माझी भूमिका काय होती हे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारावे. मी विशाळ गडासाठी आक्रमक होतो. शिवाजी महाराजांनी याचं संरक्षण केलं होतं. स्वराज्याचं रक्षण केलं होतं. या गडावर महाराजांचं वास्तव्य होतं. विशाळगड साठी मी आक्रमकपणा घेतला तर त्याचा मला गर्व आहे.’
‘कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. येथे सर्व समाजाला न्याय मिळतो. हे का घडलं याचा विचार सरकारने केला पाहिजे. पालकमंत्र्यांनी पोलिसांना सांगितलंय का की थांबा. अटक करायची की नाही हे ते विचार करुन सांगतील.’