Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: केतकी चितळेला ओळखत नाही, तिने काय केलं तेही माहीत नाही; शरद पवारांनी भाष्य करणं टाळलं

Sharad Pawar: नेमकं काय प्रकरण आहे. हे मला ठाऊक नाही. व्यक्तीही माहीत नाही. तुम्ही सांगता तेही माहीत नाही. त्यांनी काय केलं. तक्रार काय होती. एक्झॅटली काय केलं ते कळल्याशिवाय बोलता येत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar: केतकी चितळेला ओळखत नाही, तिने काय केलं तेही माहीत नाही; शरद पवारांनी भाष्य करणं टाळलं
केतकी चितळेला ओळखत नाही, तिने काय केलं तेही माहीत नाही; शरद पवारांनी भाष्य करणं टाळलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 5:41 PM

हिंगोली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यावरून दिवसभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही केतकीवर या प्रकरणी टीका केली होती. तर पुणे आणि ठाण्यात (thane) केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी केतकीला ताब्यातही घेतलं आहे. मात्र, याबाबत शरद पवार यांना विचारलं असता आपण संबंधित व्यक्तिला ओळखत नाही आणि नेमकं काय झालं ते प्रकरणही आपल्याला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पवारांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे. हिंगोलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनाही कानपिचक्या दिल्या.

नेमकं काय प्रकरण आहे. हे मला ठाऊक नाही. व्यक्तीही माहीत नाही. तुम्ही सांगता तेही माहीत नाही. त्यांनी काय केलं. तक्रार काय होती. एक्झॅटली काय केलं ते कळल्याशिवाय बोलता येत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. दोन-तीन दिवस माझ्याबद्दलची एक तक्रार वाचण्यात आली. एका कवीच्या काव्याचा मी भाषणात उल्लेख केला होता. त्यावर काही लोकांनी वेगळं मत मांडलं. पण ते वास्तव नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

राज्य अशांत करण्याचा प्रयत्न

यावेळी त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांना फटकारले. ज्यांना महाराष्ट्र आणि देशाचा इतिहास माहीत आहे. औऱंगजेबाने त्यांच्या कालखंडात काय केलं माहीत असताना कुणी तरी बाहेरून येऊन राज्य अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे. ते योग्य वाटत नाही. त्यामुळे त्याचा निषेध केला पाहिजे, असं पवार म्हणाले.

आम्ही एन्जॉय करतोय

6 जून रोजी ठाकरे सरकार जाणार असल्याचं विधान केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही एकत्रं सरकार चालवत आहोत. काही अडचणच नाहीये. आमचं व्यवस्थित चाललं आहे. सामंजस्याने चाललं आहे. आणखी पाच वर्ष आम्हाला सत्ता मिळायला हरकत नाही. हे पाच वर्ष राहीलच आणि पाच वर्ष मिळतील, असंही ते म्हणाले. तसेच, राणे साहेब, चंद्रकांत पाटील साहेब हे सारखे तारखा देत असतात. आम्ही ऐकत असतो. एन्जॉय करत असतो आणि ते सोडून देत असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्याच्या साखर कारखान्यांना सूचना

शेतकरी आत्महत्येचं वाचनात आलं. याप्रकरणाच्या खोलात गेलो नाही. यंदाच्या वर्षी जालना जिल्ह्यात आणि बीडच्या काही भागात आणि सातारमध्ये अतिरिक्त ऊस आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने साखर कारखान्यांना सूचना देत आहे. कारखाने बंद करू नका असं सरकारकडून सांगणं सुरू आहे. ते काम सरकारकडून सुरू आहे, असंही ते म्हणाले.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.