Datta Bharne: झेडपी अध्यक्ष म्हणून जेवढे काम केलं तेवढं मंत्री असूनही करू शकलो नाही; दत्तामामांची जाहीर कबुली

लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना 30 वर्षांपासून रखडली होती. दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली.

Datta Bharne: झेडपी अध्यक्ष म्हणून जेवढे काम केलं तेवढं मंत्री असूनही करू शकलो नाही; दत्तामामांची जाहीर कबुली
उजणीचा पाणी प्रश्न ऐरणीवर; दत्ता भरणेंना पालकमंत्री पदावरुन हटवण्याचा प्रयत्नImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 4:31 PM

सोलापूर: झेडपीचे (ZP)आणि माझे नाते वेगळे आहे. मी कारखान्याचा अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष होतो, आज मंत्री आहे आणि मागे आमदारही होतो. मात्र मी प्रामाणिकपणे सांगतो झेडपीचा अध्यक्ष असताना जेवढे चांगले काम केले. तेवढे काम आज मंत्री असूनही करू शकलो नाही. झेडपी अध्यक्षांनी जर मनापासून चांगले काम केले तर रात्री खूप चांगली झोप लागते. मात्र मंत्रालयात असूनही तेवढी चांगली झोप लागत नाही, अशी जाहीर कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वन, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तामामा भरणे (Datta Bharne) यांनी दिली. झेडपीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून गोरगरिबांचे समाधान करता येते. लोकांशी सातत्याने संपर्क राहतो, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हा परिषद (solapur zilla parishad) स्थापनेच्या हिरक महोत्सवाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. दत्तामामांनी जाहीरपणे आणि दिलखुलासपणे ही कबुली दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, गेल्या पंचवीस वर्षापासून इंदापूर तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत चर्चेत येणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या 348.11 कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर नगरसेवक पोपट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला दुग्धाभिषेक करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे ज्या गावात या योजनेचा फायदा होणार आहे तेथील शेतकऱ्यांनी फटाके वाजवत पेढे भरवत राज्यमंत्री भरणे यांचा जय जयकार केला.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळे-पवारांचं मार्गदर्शन

लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना 30 वर्षांपासून रखडली होती. दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली. तसेच ती पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही महिन्यात इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात या योजनेबाबत संकेत दिले होते. यासाठी प्राथमिक मंजुरी देखील घेण्याचे काम, भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्यानंतर आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही असे कळविले आहे.त्यानुसार लाकडी निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण रु. 348.11 कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अशी आहे योजना

लाकडी निंबोडी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ राष्ट्रादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले आहे. कुंभारगांव परिसरातून साधारण 765 हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल. 640 हॉर्स पॉवरचे 3 पंप व 570 हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे या योजनेतून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील 11 हजार एकर शेती ओलिताखाली येईल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.