100 पेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले, माझा गुन्हा काय?, संजय राऊत यांचा सवाल

तुरुंग हा तुरुंग असतो. मग तो आर्थर रोडचा असो की, अंदमानचा असो.

100 पेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले, माझा गुन्हा काय?, संजय राऊत यांचा सवाल
संजय राऊत यांचा सवाल Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 10:23 PM

मुंबई : संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होतो. संजय राऊथ म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा अटक करते. आम्ही कायदेशीर लढाई लढलो. आम्ही कधीही चुकीचं काम केलं नाही. एक दुसऱ्यांसोबत राजनैतिक मदभेद होतात. होत राहतील. मी शंभरपेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले. हे मी कधी विसरणार नाही. माझी कुणाही विरोधात तक्रार नाही. देशातील न्यायव्यवस्थेनं न्याय दिला आहे. न्यायव्यवस्थेचा मी आभारी आहे.

मी शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होतो. तुरुंग हा तुरुंग असतो. मग तो आर्थर रोडचा असो की, अंदमानचा असो. शंभर पेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले. माझा गुन्हा काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. मला जेलमध्ये का पाठविलं अजूनतरी मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

40 वर्षांपेक्षा जास्त काळ पत्रकारितेत आहे. 30 वर्षांपासून सामनासारख्या महत्त्वाच्या दैनिकाचा संपादक आहे. चार वेळा राज्यसभेचा खासदार झालो. 18 वर्षे खासदार आहे. अशा व्यक्तीला आपण तुरुंगात ढकलता का. शेवटी न्यायालयानं सत्ते समोर आणलं. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. आज तो विश्वास वाढलेला आहे. मी पक्ष सोडून जाणार नाही. मरेन पण पक्ष सोडणार नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

त्यानंतर संजय राऊत हे शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन ते बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार आहेत. ढोल ताश्याच्या गजरात संजय राऊथ यांचं स्वागत करण्यात आलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं.संजय राऊत यांना हात उंचावून त्यांचं अभिवादन स्वीकारलं.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.