केवळ तुम्हाला बरं वाटण्यासाठी आकड्यांची फेकाफेक करणार नाही, पण मदत नक्की करेन; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

पंचनाम्यांचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. यानंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आम्ही मदतीसंदर्भात निर्णय घेऊ. | Uddhav Thackeray

केवळ तुम्हाला बरं वाटण्यासाठी आकड्यांची फेकाफेक करणार नाही, पण मदत नक्की करेन; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 12:01 PM

उस्मानाबाद: तुम्ही मला फार मोठ्या अपेक्षेने भेटायला येत आहात. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी आता तुमच्यासमोर मदतीचे काहीही आकडे सांगणार नाही. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी तुमचं आयुष्य उभारायला पूर्ण ताकदीने मदत करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. पंचनाम्यांचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. यानंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आम्ही मदतीसंदर्भात निर्णय घेऊ. पण आता मी आकडे लावायला किंवा सांगायला आलेलो नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी तुर्तास नुकसानभरपाईसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यास नकार दिला. (CM Uddhav Thackeray Hingoli Visit)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी काटेवाडी गावातील शेतकऱ्यांंशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करुन त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करेल, असे सांगितले. मी यापूर्वी तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. आपली ओळख जुनी आहे. मध्यंतरीच्या काळात माझ्यावर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी येऊन पडली. यामध्ये माझं कर्तृत्व शून्य आहे, केवळ तुमच्याचा आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

यंदाच्या वर्षाची सुरुवात कोरोनाच्या संकटाने झाली. यानंतर पाऊस जातोय असं म्हणत असतानाच जोरदार तडाखा बसला. परतीच्या पावसाने सगळे काही हिरावून नेले. मी या सगळ्याची माहिती घेतली आहे. वेधशाळेच्या लोकांशीही माझे बोलणे झालेय. आता परतीच्या पावसाचा धोका टळला असला तरी ग्रामीण भागात सात ते आठ दिवस वीजांचा मोठ्याप्रमाणावर कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही अतिवृष्टीमुळे गेल्या दहा दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून उद्या गुरुवारी आर्थिक मदत जाहीर होणार आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बळीराजाला दिली.

संबंधित बातम्या:

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | धीर सोडू नका, हे सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

(CM Uddhav Thackeray Hingoli Visit)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.