इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, यंत्रमाग कारखानाही आगीच्या भस्मस्थानी

इचलकरंजी येथील टेक्साटाईल पार्कमधील विजेत प्रॉडक्ट्स प्रायव्हेट केमिकल फॅक्टरीला लागली आग आहे. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे शेजारी असणाऱ्या यंत्रमाग कारखानाही आगीच्या भस्मस्थानी सापडला आहे. 

इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, यंत्रमाग कारखानाही आगीच्या भस्मस्थानी
Ichalkaranji fire accident
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 12:43 PM

कोल्हापूरः इचलकरंजी (Ichalkaranji) येथील टेक्साटाईल (Textile) पार्कमधील (Park) विजेत प्रॉडक्ट्स प्रायव्हेट केमिकल फॅक्टरीला लागली आग आहे. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे शेजारी असणाऱ्या यंत्रमाग कारखानाही आगीच्या भस्मस्थानी सापडला आहे.  फॅक्टरीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाख झाल्या असून आग विझविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला जात आहे. या आगीत दोन कोटीपर्यंतच नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इचलकरंजी शहरात मोठ्या यंत्रमाग कारखाने आहेत. त्यामुळे या फॅक्टरीला लागलेल्या आगीमुळे शेजारी असणाऱ्या यंत्रमाग कारखान्याना या आगीचा धोका पोहचू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी सकाळी अचानक फॅक्टरीला कशामुळे आग लागली याची चौकशी करण्याचे कामही सुरू आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेजारी असलेल्या यंत्रमाग कारखाना मालक भीतीच्या छायेखाली आहेत.

आगीवर नियंत्रण मिळविताना मर्यादा

केमिकलच्या मोठ्या प्रमाणात आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीचे लोळ मोठे असल्याने अग्निशमन दलावर आग विझवताना मर्यादा जाणवत आहेत. त्यामुळे आगीवर बाहेरूनच नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुट्टी असल्याने जीवितहानी नाही

इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या आगीचा इतर यंत्रमाग व घरांना धोको पोहचू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानातकडून प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. केमिकल फॅक्टरीला आज सुट्टी असल्यामुळे फॅक्टरी बंद होती. त्यामुळे आगीज कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संंबंधित बातम्या

नागपुरात ST कर्मचारी संपावर तरी, आगाराचं उत्पन्न लाखोंवर!

नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

नागपुरात ST कर्मचारी संपावर तरी, आगाराचं उत्पन्न लाखोंवर!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.