गडचिरोली हल्ला : जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु
गडचिरोली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर काल गडचिरोतील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले. तर एक खासगी ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. यानंतर सध्या जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. हल्ला नेमका कुठे झाला? गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील […]
गडचिरोली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर काल गडचिरोतील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले. तर एक खासगी ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. यानंतर सध्या जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
हल्ला नेमका कुठे झाला?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. काल नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.
गडचिरोली येथील जांभूळखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्यात 15 जवान शहीद झाले. तर 1 ड्रायव्हरचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर कुरखेडा तालुक्यातून पुरडा येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी सध्या कोबिंग ऑपरेशन सुरु आहे. नक्षलवादी हल्ल्याच्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचे नक्षलवाद विरोधी प्रमुख अधिकारी लवकरच दाखल होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणच्या जंगलात नक्षलवादी लपले आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे. या ठिकाणी सध्या अँटी माईल वेहिकलचा वापर करत या ठिकाणी अजून भुसुरुंग पेरले आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे. हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी हा रस्ता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच काल पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष केले. यात 15 जवान शहीद झालेत. या सर्व शहीद जवानांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले जाणार आहेत.
Gadchiroli: Searching and combing operation going on in the Kurkheda forest area. #Maharashtra https://t.co/rA4uElYohS
— ANI (@ANI) May 2, 2019
दरम्यान काल गडचिरोली परिसरात सकाळी रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास हा भूसुरुंग स्फोट घडवण्यात आला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांना यावेळी लक्ष करण्यात आलं.
गडचिरोलीत काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचं राजकारण करु नये. तसेच यावेळी देशातील सर्वांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
संबंधित बातम्या:
गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण
गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश
जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले
नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक
गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?
आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!