‘पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते मदत करत नसतील तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’

छत्रपती संभाजी राजेंनी भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा. |

'पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते मदत करत नसतील तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा'
संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 2:22 PM

औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. राज्यात दौरे करुन किंवा आंदोलन करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही जाधव यांनी म्हटले. (If BJP and PM Narendra Modi not ready to cooperate then Sambhaji Raje Chhatrapati should resign as a MP)

ते गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी आणखी आक्रमक भूमिका घ्यावी, असे सुचविले. छत्रपती संभाजी राजेंनी भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा. जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी संभाजी राजे यांचे ऐकत नसतील, भेटत नसतील तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, संभाजीराजे गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात फिरुन मराठा आरक्षणाचे जाणकार, अभ्यासक आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी सकाळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर दुपारी ते मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर जात आहेत. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. या सगळ्या चर्चेनंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता संभाजीराजे मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन आपली अंतिम भूमिका मांडणार आहेत.

शरद पवार आणि संभाजीराजेंची अवघ्या 10 मिनिटांची चर्चा सकारात्मक कशी, विनायक मेटेंचा सवाल

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केले. एकीकडे संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला होता.

संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर विनायक मेटे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा 10 मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असे मेटे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

मोठी बातमी: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार

(If BJP and PM Narendra Modi not ready to cooperate then Sambhaji Raje Chhatrapati should resign as a MP)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.