मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील, अंजली दमानिया यांचा संताप

राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्यात आक्रोश मोर्च निघत आहेत. आता या प्रकरणात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी कालच राज्यपालांची भेट घेत या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.

मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील, अंजली दमानिया यांचा संताप
Dhananjay Munde and Anjali Damania
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 2:01 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंच वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे दिला आहे. तर बीडचे पोलिस देखील तपास करीत आहेत. या प्रकरणातील सूत्रधार म्हटले जाणारे वाल्मिक कराड हे २२ दिवसांनी सीआयडीला शरण आले. तर मारेकऱ्यांना पुणे आणि कल्याण येथून पकडण्यात आले आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हटले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्री पदावरुन दूर व्हावे अशी मागणी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी काल राज्यपालांना भेटून केली आहे. या प्रकरणात बीड येथे तळ ठोकून असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना समाजमाध्यमांवर ट्रोलींग होत असून त्यांना जीवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी काल सायंकाळी भेट घेतली आहे.

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून आहेत. त्यांना धमक्या आल्यानंतर काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज प्रसारमाध्यमांजवळ बोलताना अंजली दमानिया यानी सांगितले की मी लेखी स्वरुपात तक्रार दिली नव्हती. आपण केवळ एसपीसोबत फोनवर बोलून सगळे पुरावे पाठवले होते. माझा फोन नंबर सोशल मीडिया वर व्हायरल करून माझे फोटो अश्लील बनवून समाज माध्यमावर टाकण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पुरावे सायबर सेलकडे देण्याचे सांगितले होते. त्यानुसार सगळ्यांच्या नंबर सह सगळे पुरावे घेत रितसर तक्रार दाखल करायला या ठिकाणी आपण आले असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

माझ्या 10 मागण्या आहेत

काल सायंकाळी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 45 मिनिटं आमची चर्चा झाली. बीडची गंभीर परिस्थिती आपण त्यांना सांगितली. देशमुख यांच्या हत्येपाठचं खरं कारण काय हे आपण सांगितले. कोणी विरोधात उभे राहिले तर संतोष देशमुख सारखी तुमची गत होईल, ही दहशत जी निर्माण करत आहेत. ती दहशत मोडून काढायला हवी यासाठी काय करायला हवं याची पूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

माझ्या 10 मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्यांवर मुख्यमंत्री कारवाई करतील असे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. एसआयटी बरखास्त करणे, बीडच्या बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी आणून ती चौकशी करणे,ही चौकशी ऑन कॅमेरा व्हायला हवी, याप्रमाणे इतर मागण्या त्यांच्याकडे केल्या आहेत असेही दमानिया यांनी सांगितले.

धनंजय मुंडे राजीनामा

सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांनी स्वतः सांगितलं होतं की, मी आणि विजय पांढरे यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी हे केले होते. आज ते धनंजय मुंडे बाबत हेच का बोलत नाहीत याचे त्यांनी उत्तर द्यावं असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

धनंजय मुंडे मंत्रालयात म्हणाले की ‘आपण राजीनामा दिला नाही आणि देणार नाही’ अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे. अशी भूमिका कुठलाही सज्जन व्यक्ती असता तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असता आणि निष्पक्ष चौकशीसाठी तयार झाला असता.मी राजीनामा मी देतो असं त्यांनी म्हणाला हवं होतं. जणाची नाही तर मनाची तरी लाज हवी, कसली लाज नसल्यामुळे ते मंत्रिपद सोडायला तयार नाहीत. यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील असेही दमानिया यावेळी म्हणाल्या.

परमेश्वरच रक्षण करेल…

सुरक्षेची मागणी कधी मी केली नाही. मात्र या घटनेत काल रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी फोन करून वाल्मीक कराडचा कार्यकर्ता आहे असे सांगत मला धमकावले गेले. यांची दहशत खूप मोठ्या प्रमाणातआहे, मात्र परमेश्वर आहे आणि तो आमची सुरक्षा करेल अशी मला खात्री आहे असेही दमानिया यावेळी म्हणाल्या.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.