Alliance | मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठे विधान; नव्या राजकीय चर्चेला उधाण
संजय राऊत म्हणाले की, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती.
मुंबईः भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असे वक्तव्य रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी राऊत यांनी शरद पवारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व असल्याचे ते म्हणाले.
नेमके काय म्हणाले राऊत?
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केले. राऊत म्हणाले, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे वक्तव्य राऊत यांनी केले. राऊताच्या फटकेबाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आता यावर भाजपमधून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.
पवारांवर कौतुकाचा वर्षाव संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला. राऊत म्हणाले की, शरद पवार सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेत. कृषी, संरक्षण क्षेत्रात त्यांनी ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतरावानंतर शरद पवार आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता. 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत.
भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते. त्यांच्यासारखा एकही नेता भाजपमध्ये नाही.
-संजय राऊत, शिवसेना नेते
इतर बातम्याः
MHADA exams | म्हाडा भरती पेपर फुटीचा प्रयत्न, मोठे मासे गळाला, पुण्यात तिघा जणांना अटक