‘माझं डोकं ठिकाणावर नसतं तर…’ नाथा भाऊंनी कुणाचे काढले वाभाडे?

मला अटक होण्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. या बातम्यांमधून विरोधकांना असूरी आनंद होत होता. मात्र, या बातम्याकडे मी मनोरंजन म्हणून पाहिलं कारण मला न्याय देवतेवर विश्वास होता.

'माझं डोकं ठिकाणावर नसतं तर...' नाथा भाऊंनी कुणाचे काढले वाभाडे?
EKNATH KHADSE, MANOJ JARANGE PATIL AND SADAVARTEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 9:58 PM

जळगाव : 14 ऑक्टोबर 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाला उचकवण्याचा काम करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सभेत केला. यात काही तरी तथ्य असेल म्हणूनच जरांगे पाटील यांनी अशा गंभीर स्वरूपाचे वक्तव्य केले. पण, हिंसक घटना घडतील असे सदावर्ते म्हणाले. ते का म्हणाले ते त्यांचा माहित. त्यांना अशी माहिती कुठून मिळाली? पण आजची सभा पाहता सदावर्ते यांची विश्वासार्हता तपासण्यासारखी आहे. जरांगे पाटील खरं बोलतात की सदावर्ते हे पाहिलं अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केलीय. तसेच गिरीश महाजन संकट मोचक असतील तर अजूनही हा प्रश्न का सुटला नाही असा सवालही केला.

सरकारमधले आदरणीय संकट मोचक गिरीश महाजन हे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल संकट मोचन करण्यासाठी गेले होते. सरकार दरबारी हा प्रश्न येवून सुद्धा आतापर्यंत सुटलेला नाही. भोसरी प्रकरण असेल किंवा दाऊदच्या बायकोशी माझे संबंध असल्याचा आरोप असे अनेक आरोप झाले. मात्र, कुठल्याही आरोपात तथ्य आढळले नाही, असे ते म्हणाले.

नांदेडची जी मोठी दुर्घटना घडली ते खाते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यामुळे त्या घटनेला ते स्वतः जबाबदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील वैद्यकीय सेवा कोलमडलेली आहे. सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर नांदेडसारखीच घटना जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसे यांचे डोके ठिकाणावर नाही अशी टीका मंत्री महाजन यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे एवढा मी आर्थिक दुर्बल नाही. माझं डोकं ठिकाणावर नसतं तर गिरीश महाजन यांना उत्तर देण्याची वेळ आली नसती. गिरीश महाजन एका साध्या शिक्षकाचा मुलगा. आज हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊन बसला. शेकडो लोक मरताहेत, त्याची जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या. नुसते एकनाथ खडसेवर टोलवाटोलवी करून चालणार नाही. कारण त्या खात्याचे तुम्ही जबाबदार मंत्री होते अशी टीका खडसे यांनी केली.

उदयन राजे यांनी ज्येष्ठ नागरिक यांचे वय 60 वर्ष असते त्याप्रमाणे साठ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या राजकारण्यांनी निवृत्त व्हावे असा निर्णय शासनाने घ्यावा असे विधान केले. त्यावर बोलताना ते म्हणाले. उदयनराजे यांनी हे सरकारमध्ये आहेत. त्यामुळे साठ वर्षानंतरच्या सर्वांना राजकारणातून निवृत्त करण्याच्या निर्णयाबाबत सरकारकडे तसा आग्रह धरावा. त्यांच्या विनंतीला सरकार नक्की मान देईल अशी अपेक्षा आहे. उदयनराजे यांचे स्वतःचे वय हे साठ वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांनीही राजकारणातून आधी निवृत्त व्हावे, असे खडसे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.