Video – संजय राठोडचा राजीनामा घेतलात तर मग मलिकांचा का नाही? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर तीव्र हल्ला

नबाव मलिक थेट जेलमध्ये आहेत. त्यामुळं नवाब मलिकांना वाचविण्याचं कारण काय, त्यांच्यामागे नेमके कोण आहेत. कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचविलं जात आहे. हे प्रश्न आम्ही विचारणारच आहोत, असा घणाघास देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Video - संजय राठोडचा राजीनामा घेतलात तर मग मलिकांचा का नाही? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर तीव्र हल्ला
मुंबई येथील अधिवेशनात सभागृहाबाहेर बोलताना देवेंद्र फडणवीस.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 1:00 PM

मुंबई : एखादा मंत्री जेलमध्ये आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशाप्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे. मंत्र्यांवरील आरोप साधासुधा नाही. रिमांड आर्डरमध्ये ही केस कशी आहे, हे लिहिलं गेलं आहे. मुंबई बाँब स्फोटाच्या (Mumbai Bomb Blast) आरोपींकडून कवडीमोल भावात जमीन विकत घ्यायची. ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीची जमीन मालकाला एक पैसा द्यायचा नाही. त्या जमिनीचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसिना पारकर हिला पंचावन्न लाख रुपये द्यायचे. हे पैसे कुठे वापरले गेले, असा सवाल करत मुंबई बाँबस्फोटाकरिता हा पैसा वापरला गेला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. मुंबई येथे विधानसभेचे अधिवेशन ( Assembly Session) सुरू आहे.

मलिकांना वाचविण्याचे कारण काय

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळ प्रकरण उघडकीस आलं. मंत्री जेलमध्ये गेले. तरीही हे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहत असेल, तर हे दाऊत समर्पित सरकार आहे. असंच आम्हाला म्हणावं लागेल. म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी भाजपनं लावून धरली. संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला. इथं नबाव मलिक थेट जेलमध्ये आहेत. त्यामुळं नवाब मलिकांना वाचविण्याचं कारण काय, त्यांच्यामागे नेमके कोण आहेत. कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचविलं जात आहे. हे प्रश्न आम्ही विचारणारच आहोत.

पाहा व्हिडीओ

सरकारला विचारला जाब

नवाब मलिकांबाबत आम्ही सरकारला जाब विचारला आहे. सरकार पड काढतंय. नवाब मलिक यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढविला.

राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर आमदारांची घोषणाबाजी

राज्यपाल कोश्यारींचे ते भाषण जे सभागृहात होऊ शकलं नाही, वाचा संपूर्ण भाषण जशास तसं

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...