Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahajibapu Patil: ‘शहाजी बापू पाटलांनी थोबाड बंद केले नाही तर’..युवा सेनेने दिला थेट इशाराच

गुवाहाटीला गेल्यानंतर शहाजीबापू यांची फोनवरील एक ऑडिओक्लीप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यात धर्मपत्नीला साडी घेता येत नाही, असे वक्तव्य आमदार शहाजीबापूंनी केले होते. त्याचा उल्लेख करत हे आमदार महोदय उद्धव ठाकरेंना काय भाड्याने बंगला घेऊन देणार असा सवाल युवा सेनेने विचारला आहे.

Shahajibapu Patil: 'शहाजी बापू पाटलांनी थोबाड बंद केले नाही तर'..युवा सेनेने दिला थेट इशाराच
शहाजीबापूंना युवासेनेचा इशारा
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 7:25 PM

सोलापूर – एकनाथ शिंदे गटातील गुवाहाटी फेम शाहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil)हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या शिवसेनेच्या चांगेलच टार्गेटवर आहेत. नुकत्याच शहाजीबापूंच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर आता युवा सेनाही (Yuva Sena)त्यांच्याविरोधात आक्रमक झालेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरे यांना भाड्याने बंगला घेऊन देतो, अशा आशयाचे विधान शहाजीबापू यांनी केले होते. त्याच्यावर युवा सेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. आमदार शहाजीबापू यांनी तों बंद ठेवले नाही तर त्यांच्या घरावर साडी आणि बाटल्यांचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा युवा सेनेकडून देण्यात आला आहे. शहाजी पाटलांनी एवढ्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीबाबत आक्षेपार्ह विधान करुन फार मोठी चूक केली आहे. त्यांनी जर ही टीका बंद केली नाही तर त्याचे परिणाम रस्त्यावर पाहायला मिळतील असा अशारा युवा सेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी दिली आहे.

आधी पत्नीला साडी घेता येत नव्हती- युवा सेना

गुवाहाटीला गेल्यानंतर शहाजीबापू यांची फोनवरील एक ऑडिओक्लीप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यात धर्मपत्नीला साडी घेता येत नाही, असे वक्तव्य आमदार शहाजीबापूंनी केले होते. त्याचा उल्लेख करत हे आमदार महोदय उद्धव ठाकरेंना काय भाड्याने बंगला घेऊन देणार असा सवाल युवा सेनेने विचारला आहे. त्यावेळी माध्यमांसमोर ओरडून शहाजीबापू बायकोला साडी घेऊ शकत नाही, असे सांगत होते. याची आठवणही करुन देण्यात आली आहे.

शहाजीबापूंच्या दारुच्या बिलावरुनही टीका

असे वक्तव्य करण्यापूर्वी शहाजीबापू यांनी संत्र्याची दारु प्यायली होती की हातभट्टीची, हे पाहावे लागेल, अशी टीका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शहाजीबापू दारू प्यायला बसल्यावर ते स्वतः बील देवू शकत नाही. दुसऱ्याला बील द्यावे लागते. अशी टीकाही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अगाऊपणा थांबला नाही तर जशास तसे उत्तर

शहाजीबापू पाटील यांचा आगाऊपणा यापुढे थांबला नाही तर त्यांना रस्त्यावर उतरुन, शिवसेना स्टाईलने याचा जाब विचारला जाईल. असा इशाराही देण्यात आला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उठतील आणि याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असतील, असेही .युवा सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काय म्हणाले होते शहाजीबापू

शहाजीबापू यांना पुढच्या निवडणुकीत जिंकता येणार नाही, अशी टीका शिवसेनेने केली होती, त्यावर उत्तर देताना शहाजीबापू म्हमआले होते की- मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांना सांगोल्यात दोन बंगदले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर काय लक्ष ठेवायचं ते ठेवा आणि काय पाडायचं ते पाडाय राज्यात सर्वाधिक वेळा पडण्याचा विक्रम माझ्याच नावावर आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.