खुलेआम दंगलीवर कारवाई नाही, पोलिसांनी दंडुका उगारल्यास त्यांची मते जातील, चंद्रकांत पाटील यांची टीका
गृहमंत्री जेलमध्ये आहे. काही जात्यात आहेत, तर काही सुपात असे सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
नाशिकः अमरावतीत खुलेआम दंगल झाली. माजी मंत्र्यांचे ऑफिस फोडले, पण कारवाई कोण करेल. पोलिसांनी दंडुका उगारला, तर त्यांची मते जातील, अशी टीका शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते नाशिकमध्ये विकासकामांचे उद्घाटन झाल्यानंतर बोलत होते.
पाटील म्हणाले की, काम राहिली असतील, तर नगरसेवकांच्या मागे लागून करून घ्या. पण विकासकामे सुरू ठेवायचे असतील, तर पुन्हा सत्ता द्या. मोदीजींना मुख्यमंत्री म्हणून देखील 15 वर्षांचा वेळ मिळाला. त्यामुळे गुजरातचा विकास झाला. आता पाहा देशात तिसऱ्या टर्मला भाजप 418 खासदार निवडूण आणणार. महाराष्ट्रात जसं मधेच सरकार गेलं आणि आपण पश्चाताप करतो, तसं होऊ देऊ नका. देवेंद्रजीचे काम बघून लोकांनी मतदान केलं, पण गद्दारी झाली, असा आरोप त्यांनी केला.
सध्या ड्रग्जला समर्थन दिले जात आहे. मात्र, तुम्हाला झोपताना, उठताना बीजेपी दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला. आरोग्य पेपर आम्हीच फोडला. शेतकरी पैसे आम्ही थांबवले. अरे काय चेष्टा चाललीय. सगळीकडे भाजपचा हात मग तुम्ही 3 पक्ष समर्थ आहात ना ? भाजपचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. तुम्ही तिघेही दुबळे आम्ही श्रेष्ठ आहोत. सरकारने हे थांबवण्याचा प्रयत्न केला, तर पद जातील. गृहमंत्री जेलमध्ये आहेत. काही सुपात आहेत, तर काही जात्यात, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केली. पाटील म्हणाले, चूक झाली तर सांगा, पण सारखं सरकार बदलू नका. त्रिपुरात कथित अनुचित प्रकार घडला. मात्र, दंगल मालेगाव आणि अमरावतीमध्ये झाली. इतकी वर्ष हिम्मत झाली नाही का. इतकी हिम्मत होते, कारण पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांनी दंडुका उगारला, तर त्यांची मते जातील. अमरावतीत खुले आम दंगल झाली. माजी मंत्र्यांचे ऑफिस फोडले, पण कारवाई कोण करेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, शाळेच्या उद्घाटनाला आलो होतो. मात्र, इथे मी मंत्री झाल्यानंतर माझा सत्कार झाला. मी नगरसेवकाची एवढी मोठी सभा पहिली नाही. माझ्या सारख्याने 3 वेळेस मंत्री होणं हे मोदींजींच्या सरकरमध्येच होऊ शकते. देशाचे नेतृत्व खंबीर म्हणून लाट थोपवण्याचे काम मोदींनी केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
इतर बातम्याः
न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे धोकादायक, सरकारने गांभीर्याने घ्यावे, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं; राजकीय संन्यास की उगवतीचा सूर्य, घ्या जाणून!
Sonam Kapoor | भारतीय पोशाखातही ग्लॅमरचा तडका, सोनम कपूरचा दिलकश अंदाज पाहून चाहतेही घायाळ!#SonamKapoor | #Bollywood | #Entertainment https://t.co/QPw67BsFsS
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2021